Tarun Bharat

मुतगा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक-बालक मेळावा

सांबरा/ वार्ताहर

मुतगे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक-बालक मेळावा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष आर. वाय.  पाटील होते.

मुख्याध्यापक एम. वाय. केदार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष सुनील अष्टेकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळा समितीचे सदस्य एन. डी. बंडाचे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय कशाप्रकारे लावून घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिक्षकांच्यावतीने बी. बी. कोंडुसकोप यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पालकांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे, हे सांगून शाळा, शिक्षक, पालक यांचा समन्वय साधला.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे, आपल्या बालकांना या वयात चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्या घरचा आणि शाळेचा परिसर त्याच्यावर मोठा परिणाम होत असतो, कोरोनासारख्या परिस्थितीतही शिक्षक आपली भूमिका बजावत आहेत, त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा तितक्मयाच जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी केले.

पालक व शिक्षकांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी चर्चा झाली. याप्रसंगी सर्व पालकवर्ग, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम कुराडे यांनी केले तर एस. के. मोरे यांनी आभार मानले.

Related Stories

वरेरकर नाटय़संघातील चित्र प्रदर्शनाची सांगता

Amit Kulkarni

जमखंडीत 508 तांदळाची पोती जप्त

Patil_p

लाल-पिवळा हटविण्यासाठी पुन्हा मागितला वेळ

Amit Kulkarni

कोणता उपाय घेऊ हाती?

Amit Kulkarni

बसथांब्यामध्ये वाहने; प्रवासी रस्त्यावर

Amit Kulkarni

वडगाव-धामणेतील बळ्ळारी नाल्यावर वाहनांना धोका

Amit Kulkarni