Tarun Bharat

मुरगाव पालिकेच्या अंदाज पत्रकावर येत्या 30 रोजी चर्चा, पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

मुरगाव पालिका मंडळ येत्या 30 रोजी अंदाज पत्रक मांडून संमत करणार आहे. बुधवारी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन येत्या 30 रोजी अंदाज पत्रकासंबंधीत बैठक घेण्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीत विकास कामांसंबंधीही चर्चा झाली.

कोविड निर्बंधांमुळे मुरगाव पालिकेला बैठक घेणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे काल बुधवारी ही बैठक घेण्यात आली. ही बैठक यापूर्वी तहकुब करण्यात आली होती. काल ती पुन्हा घेण्यात आली. या बैठकीत एकूण 23 विषयांवर चर्चा करण्यात आली. यात पालिकेला मिळणाऱया विकास कामांसंबंधीत निधी, घरोघरी कचरा गोळा करण्याचा विषय, भटक्या गुरांची समस्या तसेच मान्सूनपूर्व कामे इत्यादी विषयांचा समावेश होता. पालिकेला प्रत्येक प्रभागात विकास कामे हाती घेण्यासाठी निधी मंजूर झालेला असून या कामांसंबंधीत चर्चा करण्यात आली. मुरगाव पालिकेने घरोघरी कचरा गोळय़ात करण्याच्या कामात सुधारणा करण्याचे ठरवलेले असून आता घरोघरी कचरा गोळा करण्याचे शुल्क घरपट्टीच्या माध्यमातून वसुल करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेकेदारांना दर महिन्याला शुल्क मागावे लागणार नाही. मात्र, पालिका क्षेत्रातील सर्वच घरांना घरपट्टी लागू झालेली नाही. साधारण तीस टक्के घरे अद्यापही घरपट्टीवीना आहेत. त्या घरांचे काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला असून अशा घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून कशी वसुली करावी याबाबत निर्णय घेण्यात येईल.  रस्त्यांवर फिरणाऱया भटक्या गुरांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. भटक्या गुरांना पकडून त्यांची गोशाळेत पाठवणी करण्यासंबंधी योजना सरकारने जारी केलेली असून पालिकाच ही कामगीरी बजावणार आहेत. वास्को शहर परीसरातही भटक्या गुरांची समस्या गंभीर असल्याने पालिका अशा गुरांना पकडून त्यांची रवानगी गोशाळेत करणार आहे.

या पालिका बैठकीत मान्सूनपूर्व कामांसंबंधीही चर्चा झाली. मागच्या वर्षी पालिका निवडणुकानिमित्त असलेली आचारसंहिता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि पालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने मान्सूनपूर्व कामांवर परीणाम झाला होता. त्यापूर्वीसुध्दा कोरोनाची साथ होती. तसेच मान्सूनपूर्व कामांसाठी तैनात करण्यात आलेल्या कामगारांना व्यवस्थीत वेतन देण्यास पालिकेला शक्य झाले नव्हते. याचाही परीणाम मागच्या वेळी मान्सूनपूर्व कामांवर झाला होता. यंदाही मान्सून तोंडावर आलेला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांना सुरवात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुरगाव पालिका मंडळाचा अर्थसंकल्प येत्या दि. 30 रोजी मांडण्यात येणार आहे.

Related Stories

खलाशांना आणण्याच्या निर्णयाबद्दल चर्चिलकडून सरकारला धन्यवाद

Omkar B

सेरुला भूखंडप्रकरणी तीन आठवडय़ात उत्तर सादर करा

Patil_p

मडगाव नगराध्यक्षांची 12 रोजी निवड

Amit Kulkarni

चंदीगढ महापालिका निवडणुकीत ‘आप’चा 14 जागांवर विजय

Amit Kulkarni

आमदार,मंत्र्यांचे वेतन भत्यांसह मदत निधीत जमा करा

Omkar B

गोव्यात रेल्वे घातपाताचे षडयंत्र उघड

Patil_p
error: Content is protected !!