Tarun Bharat

मुरगाव पालिकेच्या 125 उमेदवारांचे भवितव्य असुरक्षीत

स्ट्राँग रूममध्ये, माजी नगराध्यक्षांची तक्रार

प्रतिनिधी/ वास्को

मुरगावच्या पालिका निवडणुकीतील 125 उमेदवारांचे भवितव्य ज्या मतपेटय़ांमध्ये सिलबंद आहे. त्या पेटय़ा खरेच सुरक्षीत आहेत काय असा प्रश्न मुरगावचे माजी नगराध्यक्ष व यंदाच्या निवडणुकीतील एक प्रमुख उमेदवार मनेष आरोलकर यांनी व्यक्त केला आहे. मुरगावच्या स्ट्रॉग रूमचे धक्कादायक प्रकार असे वर्णन त्यांनी केले असून या संबंधी त्यांनी मुरगावचे उपजिल्हाधिकारी तसेच निर्वाचन अधिकारी सचिन देसाई यांना लेखी तक्रार पाठवली आहे.

मुरगावच्या पालिका निवडणुकीतील मतपेटय़ा कुठे आणि किती सुरक्षीतरीत्या ठेवल्या असतील याची कल्पना 125 पैकी बहुतेक उमेदवारांना नसेल. हे उमेदवार उद्या सोमवारी मतमोजण्याच्या वेळीच आपल्या मतपेटय़ांचे पुन्हा एकदा दर्शन घेतील. मात्र, माजी नगराध्यक्ष मनेष आरोलकर यांनी मतपेटय़ांच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्तकता दाखवली आहे. त्यांनी शनिवारी संध्याकाळी मतपेटय़ा ठेवलेल्या खोलीची पाहणी केली व संताप व्यक्त केला. स्ट्रॉग रूम म्हणून ओळखली ही खोली वास्को शहरातील स्वतंत्र्य पथावरील एमपीटी इन्स्टीटय़ुट हॉलच्या बाजुलाच आहे. ही खोली असुरक्षीत असून या असुरक्षीत खोलीतील मतपेटय़ांमध्ये 125 उमेदवारांचे भवितव्य सिलबंध आहे. या खोलीला हॉलच्या आतून दरवाजा आहे. तीथे पोलीस सुरक्षा आहे. परंतु या स्ट्रॉग रूमला बाहेरच्या बाजुनेही एक दरवाजा असून तीला जीर्णावस्थेतील एक कडी व छोटे कुलुप आहे. आत एक प्लायव्हुडची भिंत असल्याचे समजते. तो दरवाजा आणि तो प्लायव्हुड कोणीही सहज भेदू शकतो. पूर्ण अंधार आणि मच्छरांच्या हैदोसात तीथे रात्रीच्या वेळी पोलीस पहारा कठीण ठरणारा आहे. या असुरक्षीत स्ट्रॉग रूमची दखल घेऊन आरोलकर यांनी मुरगावचे उपजिल्हाधिकारी तसेच निर्वाचन अधिकारी सचिन देसाई यांच्याकडे तक्रार करून मतपेटय़ांच्या सुरक्षेसाठी कडक दक्षता घेण्याची मागणी केली आहे.

Related Stories

कामा आयुर्वेद स्टोअरचे पणजीत उद्घाटन

Amit Kulkarni

मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या सातव्या मोसमाचे विजेते

Patil_p

मडगाव पालिकेच्या प्रभाग 25 मध्ये डेंग्यू, मलेरियासंदर्भात जनजागृती

Amit Kulkarni

युद्ध, आपत्तकालीन मृतांची ओळख पटविण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ची गरज

Amit Kulkarni

कांपाल – पणजी येथे 20 फेब्रुवारीपासून शिवलिंग दर्शन महोत्सव

Patil_p

कुडचडे – काकोडा गणेशोत्सवाच्या देणगी कूपन विक्रीस प्रारंभ

Amit Kulkarni