Tarun Bharat

मुरगाव पालिकेसाठी सोमवारी 34 उमेदवारी अर्ज दाखल, एकूण संख्या 54

प्रतिनिधी / वास्को

मुरगाव पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण उमेदवारी अर्जांची संख्या 54 झाली आहे. पहिले तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ होती. सोमवारपासून या प्रक्रियेला गती आली आहे.

 प्रभाग क्र. 1 मध्ये मंजुषा मोहन पिळणकर व दीक्षा दामोदर तळवणेकर, प्रभाग क्र. 2 मध्ये सरोज शिवराम मांद्रेकर, दयानंद लक्ष्मण नाईक, प्रभाग क्र. 3 मध्ये कुणाली कृष्णा मांद्रेकर, साक्षी सुरज मांद्रेकर, प्रभाग क्र. 4 मध्ये दामोदर सखाराम कासकर, अर्चना कुशाजी कोचरेकर, प्रभाग क्र. 5 मध्ये दामोदर मधू नाईक, प्रभाग क्र. 6 मध्ये प्रजय प्रदीप मयेकर, प्रभाग क्र. 7 मध्ये रामचंद्र सुब्राय कामत, शरद चंद्रकांत चोपडेकर, संदेश जनार्धन मेस्ता, प्रभाग क्र. 8 मध्ये मुरारी कृष्णा बांदेकर, श्रद्धा संकल्प आमोणकर,  प्रभाग क्र. 9 मध्ये तनुजा अनंत सावंत, योगिता जी. पार्सेकर, प्रभाग क्र. 10 मध्ये स्नेहल स्वराज नाईक, सुचिता नामदेव शिरोडकर, प्रभाग क्र. 12 मध्ये दीपक ज्ञानेश्वर नाईक, अमिनदिन मोहिदीनसाब मुल्लाल, प्रभाग क्र. 14 मध्ये कुस्तोदिओ डि सोजा, संदीप रामदास तिळवे, प्रभाग क्र. 15 मध्ये जॉर्जिना फियोला रेगो, नयना नरेश नाईक, प्रभाग क्र. 16 मध्ये गिरीष आत्माराम बोरकर, प्रभाग क्र. 17 मध्ये श्रद्धा बाळकृष्ण साळगावकर, सिद्धार्थ तुकाराम कासकर, प्रभाग क्र. 18 मध्ये विशाल भानुदास नाईक, प्रभाग क्र. 20 मध्ये यतीन भालचंद्र कामुर्लेकर, प्रभाग क्र. 21 मध्ये अक्षता अर्जुन आजगांवकर, प्रभाग क्र. 22 मध्ये वासुदेव श्रीपाद साळगांवकर, प्रभाग क्र. 24 मध्ये अनिषा एस्कोलास्टिका नोरोन्हा, प्रभाग क्र. 25 मध्ये लिओ जुझे रॉड्रिग्स यांचा समावेश आहे. मुरगांवसाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या 54 झाली.

दरम्यान, पालिका निवडणुकीसाठी नवनवीन उमेदवार तयार होत असून ईच्छुकांना हुरूप आलेला आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढत आहे.

Related Stories

खोल येथे साळेरी पुलानजीक दरड कोसळली

Amit Kulkarni

शिरोडय़ातील शेतकरीच गुंतले भगदाड बुजविण्याच्या कामात

Amit Kulkarni

गोमंतकीयांपेक्षा बिगरगोमंतकीयांकडे सरकारचा कौल जास्त

Patil_p

मडगाव न्यू मार्केटातील व्यापाऱयांचाही वटहुकुमाला विरोध

Patil_p

मडगावात लाखो रुपयांच्या इलेक्ट्रीक यंत्रणेची चोरी

Patil_p

त्रिसदस्यीय प्रशासक समितीने घेतला गोवा डेअरीचा ताबा

Omkar B