Tarun Bharat

मुलांच्या लसीकरणासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी

दहावीतील ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राहय़ : 3 जानेवारीपासून मिळणार डोस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतात आता अल्पवयीन मुलांचेही लसीकरण सुरू होत असून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येणार आहे. लसीकरणासाठीची नोंदणी को-विन ऍपवर होणार असून दहावीचे ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य मानले जाईल. मुलांच्या लसीकरणाबरोबरच 60 वर्षांवरील वयोवृद्धांच्या प्रिकॉशनरी (दक्षता किंवा बुस्टर) डोसबाबतही नवे निर्देश केंद्र सरकारकडून राज्यांना कळविण्यात आले आहे.

पुढील वर्षारंभी सुरू होणाऱया या लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखीच असून ती 1 जानेवारी 2022 पासून करता येईल. सध्या काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे शालेय आय-कार्ड पुरावा समजला जाणार असल्याचे को-विन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी सोमवारी जाहीर केले.

60 वर्षांवरील लाभार्थींचीही ‘बुस्टर’साठी नोंदणी होणार

60 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासंबंधी आरोग्य मंत्रालयाने काही नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कोरोनाचा दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले लाभार्थी तिसऱया प्रिस्क्रिप्शन (बुस्टर) डोससाठी अर्ज करू शकतील. केंद्राने पुढील वषी 10 जानेवारीपासून आरोग्यसेवा कर्मचाऱयांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तिसरा डोस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 60 वर्षांवरील विविध आजारांशी लढणारे नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिकृत प्रमाणपत्र घेऊन नोंदणी करू शकणार असल्याचेही डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मोहिमेला बळ

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना तीन मोठय़ा घोषणा केल्या. यामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करणार असल्याचे जाहीर केले. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसेच कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱया विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि प्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणांनंतर बुस्टर डोसही देण्याची सुरुवात 10 जानेवारी, 2022 पासून करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बुस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते.

आतापर्यंत 141 कोटींहून अधिक डोस

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 141 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. रविवारी 29 लाख 93 हजार 283 डोस देण्यात आल्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या लसीच्या डोसचा आकडा 141 कोटी 70 लाख 25 हजार 654 वर पोहोचला आहे.

Related Stories

पंजाब : कोरोना रुग्णांची संख्या 1.32 लाख पार

Tousif Mujawar

जातीय जनगणनेची नितीश कुमारांची मागणी

Patil_p

सौरदिवे वितरणाचा विक्रम

Patil_p

के.के. वेणुगोपाल यांना मुदतवाढ

Patil_p

पुढील वर्षीही राहुल गांधींची पदयात्रा

Patil_p

सराव शिबिरासाठी 24 जणांचा संघ जाहीर

Patil_p