Tarun Bharat

मुलांना छंदाकडे वळविण्याची गरज

तरुजा हिरेमठ यांचे मत : इनरव्हील क्लबतर्फे ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व-चित्रकला स्पर्धा उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना जात नाही… शाळा उघडत नाहीत… अशा परिस्थितीत मुले कंटाळून गेली आहेत. अशा मुलांना चांगल्या छंदाकडे वळविण्यासाठी इनरव्हील क्लबने घेतलेला चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे, असे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या पत्नी तरुजा हिरेमठ यांनी व्यक्त केले.

इनरव्हील क्लबतर्फे ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, सचिव डॉ. सविता कद्दू व सुनंदा करलिंगण्णावर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना डॉ. सुषमा शेट्टी म्हणाल्या, इनरव्हील ही महिलांची नोंदणीकृत संस्था आहे. अनेक वर्षे ती समाजासाठी विविध उपक्रम राबविते. यावषी ‘पिंक फर्स्ट’ ही थीम आहे. म्हणजेच महिलांनी महिलांसाठी उभे राहणे व मदत करणे होय. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे यासाठी वनमहोत्सवाबरोबरच ‘सेव्ह द अर्थ’ ही स्पर्धा घेतली आणि मुलांनी अतिशय कल्पकतेने चित्रे रेखाटली हे विशेष होय.

याप्रसंगी चित्रकलेच्या परीक्षक प्रिया खटाव, वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक स्मिता दळवी यांचा परिचय बेला शिवलकर व कीर्ती टेंबे यांनी करून दिला. अध्यक्षांच्या हस्ते तरुजा हिरेमठ यांना भेटवस्तु देण्यात आली. त्यांच्याच हस्ते सर्व विजेत्यांना रोप, चषक व प्रमाणपत्रे देण्यात आली. अधिकाधिक स्पर्धक सहभागी झाल्याबद्दल केएलई व केएलएस या शाळांना ट्रॉफी देण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत जागरुक करण्यासाठी 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पृथ्वीचे संरक्षण’ ही वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत 40 व चित्रकला स्पर्धेत 135 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण प्रिया खटाव यांनी व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण स्मिता दळवी यांनी केले.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-

1) अनिमिष हेगडे, 2) शरधी, 3) आदिती कामते, उत्तेजनार्थ साची निट्टूरकर, रोशनी कित्तूरकर, मुस्कान पेंडारी.

चित्रकला स्पर्धा : 1) गौरांग तरळे व स्वरांजली कारेकर, 2) रेहा शिंदे व तन्वी मोतेकर, 3) विभावरी बडमंजी व तन्वी धाराप्पणावर, उत्तेजनार्थ स्वयं रोकडे, तन्वी नंद्याळकर, पूर्वा जाधव.

परीक्षक प्रशंसा पुरस्कार : प्रितम शिरोळकर, भक्ती तरळे, रिया पाटील, श्रेणीक शहा. या कार्यक्रमासाठी सुनीता हणमशेट व अर्चना शेट्टी यांचे सहकार्य लाभले. डॉ. सविता कद्दु यांनी आभार मानले. 

Related Stories

मैत्री क्लबतर्फे शहरात प्रथमच ‘पिंक टॉयलेट’

Omkar B

गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱयांना पोलीस अधिकाऱयांकडून मार्गदर्शन

Patil_p

शुक्रवारी 271 नवे रुग्ण ; 6 जणांचा मृत्यू

Patil_p

कंग्राळी खुर्द येथे युवकाचा चाकूने भोसकून खून

tarunbharat

नाझर कॅम्पमधील विहिरीच्या दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

Amit Kulkarni

तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल अंधारात

Patil_p