मेघालयाच्या मावलिननाँग गावाची ओळख म्हणजे साफ रस्ते, प्रकाशाने उजळणाऱया गल्ल्या आहे. येथील लोकांनी स्वतःच्या गावाला आदर्श गाव केले आहे. या सुंदर गावात प्लास्टिकचा वापर केला जात नाही. येथे बांबूने तयार करण्यात आलेल्या डस्टबिनचा वापर करण्यात येतो. मेघालयाच्या मावलिननाँग गावात लोक सामग्री आणण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर करतात. हे गाव महिला सशक्तीकरणाचे उदाहरण आहे. येथे मुलांना आईचे आडनाव प्राप्त होते आणि वडिलोपार्जित मालमत्ता आईकडून घरातील सर्वात छोटय़ा मुलीला देण्यात येते.


previous post
next post