Tarun Bharat

मुलांसह पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुलांसह पत्नी माहेरी गेल्यामुळे पतीने राहत्या घरी दोरीने गळफास घेतल्याची घटना शहरातील उद्यमनगर येथे घडल़ी या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन रामचंद्र ठीक (41, लेप्रसी हॉस्पीटलमागे उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी गळफासाने आपले जीवन सुंष्टात आणले. ही घटना 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान घडली. या बद्दल संजय रामचंद्र ठीक (43, लेप्रसी हॉस्पीटलमागे उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात माहिती दिल़ी  मृत सचिन ठीक यांची पत्नी पायल आपल्या मुलांसह माहेरी गेली होत़ी  यामुळे अस्वस्थ असलेल्या सचिन यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यांनी राहत्या घरी सिमेंटच्या पिलरला दोरीने गळफास घेतल़ा  या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत़

Related Stories

तळेरेत तब्बल अकरा दुकाने चोरट्यांनी फोडली

Anuja Kudatarkar

कोकण मार्गावर आजपासून राजधानी एक्स्प्रेस धावणार

Patil_p

सोळा हजार ‘कोरोना लस’ उपलब्ध

NIKHIL_N

चार महिन्यानंतर रूग्णसंख्या शंभरीच्या आत

Patil_p

आचऱ्यात १५ वा वित्त आयोग गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

गरोदर महिलेला अडविल्याने प्रशासन-रहिवासी आमनेसामने

Patil_p