Tarun Bharat

मुलांसाठी भारतात लस विकसित

Advertisements

जायडस कॅडिला कंपनीला यश -जुलैपर्यंत मंजुरी मिळण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था  / अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबाद येथील जायडस कॅडिला या कंपनीने कोरोनावरील स्वतःची लस ‘जायकोव्ह-डी’चे 5-12 वर्षांच्या मुलांवर परीक्षण करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली आहे. जायकोव्ह-डी प्लाजमिड डीएनए लस असून ती न्यूक्लिएक ऍसिड व्हॅक्सिन अंतर्गत येते. जायडस कॅडिलाने अलिकडेच प्रौढांसाठी 800 क्लिनिकल ट्रायल्स केले आहेत.

स्वतःच्या लसीसाठी जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत आपत्कालीन मंजुरी मिळविण्याची कंपनीची तयारी आहे. आमच्याकडे 5-12 वयोगटातील मुलांवर लसीच्या परीक्षणाशी संबंधित उत्तम डाटा असणार आहे. सर्वकाही सुरळीत पार पडल्यास 12-18 वयोगटातील मुलांसाठी लसीला मंजुरी मिळणार असल्याचे उद्गार कॅडिला हेल्थकेयर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरविल पटेल यांनी काढले आहेत.

लसीचा विकास नेहमी टप्प्यांमध्ये होत असतो. सर्वप्रथम प्रौढांसाठी, नंतर मुलांकरता आणि त्यानंतर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लस विकसित करण्यात येते. आमची लस मुलांसाठी अधिक लाभप्रद ठरणार आहे. यात कुठलाच दुष्परिणाम दिसून येणार नाही. या लसीचा आणखी एक लाभ म्हणजे यात इंजेक्शनची गरज भासत नसल्याचे ते म्हणाले.

जायडस कॅडिलाने अलिकडेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोरोनावरील उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलच्या ह्युमन क्लिनिकल ट्रायलसाठी अनुमती मागितली आहे. जायडसला डीसीजीआयकडून झेआरसी-3308 लसीच्या तिसऱया टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी अनुमतीची प्रतीक्षा आहे. ही लस कोरोना विषाणूच्या दोन मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे कॉकटेल (मिश्राण) असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

Related Stories

शोपियांमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

‘काँग्रेसमुक्त भारत’ हे ममता-भाजपचे स्वप्न

datta jadhav

सीपीएम नेता सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनाने निधन

Tousif Mujawar

नाशिकच्या कोब्रा कमांडोला छत्तीसगडमध्ये वीरमरण

Patil_p

काँग्रेसचा ‘आप’ला प्रत्युत्तर

Patil_p

पोलीस स्थानक पेटविणारा आरोपी ठार

Patil_p
error: Content is protected !!