Tarun Bharat

मुलाच्या उंचीमुळे बदलले घराचे छत

आईवडिलांना आणावे लागतात 20 नंबरचे बूट, 7.5 फूटांचा रियोक्स जगातील सर्वात उंच मुलगा

जगात कुणी कमी उंचीमुळे चर्चेत राहतो, तर कुणी स्वतःच्या अधिक उंचीमुळे. कॅनडाचा एक किशोरवयीन ओलिवर रियोक्सची उंची 7 फूट 5 इंच इतकी आहे. जगातील सर्वाधिक उंच किशोरवयीन असण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्याचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात उंच किशोरवयीनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7.5 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. व्हिडिओत रियोक्स घरामध्ये शिरण्यासाठी वाकताना दिसून येतो. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये रियोक्स 15 वर्षांचा असताना त्याला जगातील सर्वात उंच किशोरवयीनाचा मान मिळाला होता.

सर्वात उंच किशोरवयीन (पुरुष) 226.9 सेंटीमीटर (7 फूट 5 इंच) असे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने नमूद केले आहे. एका इन्स्टाग्राम युजरने रियोक्सला बास्केटबॉलसोबत बघून आनंदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱया युजरने ‘त्याचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असेल’ असे नमूद केले आहे. ओलिवियर रियोक्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात छायाचित्रकारांना छायाचित्र काढण्यासाठी कशाप्रकारे टेबलवर उभे रहावे लागतेय हे दिसून येते.

कुटुंबीय अधिक उंचीचे

रियोक्सच्या कुटुंबातील सर्वजण अधिक उंचीचे आहेत. रियोक्सची आई 6 फूट 2 इंच उंचीची आहे. तर वडिल 6 फूट 8 इंच उंचीचे आहेत. रियोक्स 20 नंबरचे बूट घालतो, लहानपणापासूनच रियोक्स अन्य मुलांच्या तुलनेत खूपच उंच होता. रियोक्सची उंची पाहून त्याच्या आईवडिलांनी घरात मोठा बदल करवून घेतला आहे. छत सरासरीपेक्षा अधिक उंच केले आहे. रियोक्स कमाल 6 फूट 5 इंच उंचीचा होईल असे डॉक्टरने म्हटले होते, परंतु त्याची उंची 7 फुटांपेक्षा अधिक झाली आहे. यापूर्वी यासंबंधीचा विक्रम चीनच्या रेन कीयू याच्या नावावर होता, त्याची उंची 7 फूट 3 इंच इतकी होती.

Related Stories

अधिक शक्तिशाली होणार चिनी अध्यक्ष

Patil_p

मेक्सिकोत बाधितांनी गाठला 11 लाखांचा आकडा

datta jadhav

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन

Patil_p

दहशतवादी यासीन मलिकसाठी पाकिस्तान सरसावला

Patil_p

फ्रान्सकडून रशियाला झटका

Patil_p

कोरोना निर्बंध, न्यूझीलंड पंतप्रधानांचा विवाह रद्द

Patil_p