Tarun Bharat

मुलायमसिंह यांच्या सूनबाई भाजपात?

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच समाजवादी पक्षाने भाजपच्या दोन मंत्र्यांसह आठ आमदारांना फोडून भाजपला मोठा धक्का दिला. आता भाजपही सपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपने सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या घरात फूट पाडली असून, मुलायमसिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.

लखनऊमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि उत्तरप्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. याचवेळी अपर्णाही भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाजप कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांचा मोठा मुलगा प्रतिक यादव यांच्या पत्नी आहेत. अपर्णा समाजवादी पक्षात असूनही त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर स्तुती करताना दिसत होत्या. अपर्णा यांनी लखनऊच्या कँट मतदारसंघातून 2017 ला विधानसभा निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला होता.

Related Stories

दिल्लीच्या दिलशाद गार्डनमध्ये कोविड-19 वर मिळवले नियंत्रण

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 6,600 नवे रुग्ण; 231 मृत्यू

Tousif Mujawar

स्कोडा ऑटो इंडियाचे उत्पादन सुरू

Patil_p

अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कार्यालय व निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही आयकरची तपासणी

Archana Banage

केरळमध्ये अर्ध्यावर आली हत्तींची संख्या

Patil_p

उत्तराखंडात 550 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

Tousif Mujawar