Tarun Bharat

मुलायम यादवांच्या सुनेकडून राम मंदिर उभारणीसाठी देणगी

वृत्तसंस्था/ लखनौ

अयोध्येत उभारण्यात येणाऱया राम मंदिरासाठी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबाकडूनही देणगी (समर्पण निधी) प्राप्त झाली आहे. मुलायम यांची धाकटी सून अपर्णा यादवने 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

1990 मध्ये मुख्यमंत्री असताना मुलायम सिंग यांनी कारसेवकांवर गोळय़ा झाडण्याचा आदेश दिला होता. तर अलिकडेच त्यांचे पुत्र अखिलेश यांनी राम मंदिरासाठी निधी जमविणाऱयांना ‘चंदाजीवी’ संबोधिले होते. मुलायम यांच्या कार्यकाळात काय घडले यावर टिप्पणी करू इच्छित नाही. निघून गेलेला काळ कधीच भविष्याची बरोबरी करू शकत नाही. आमच्या पुढील पिढय़ांनी रामभक्त असावे असे माझे मानणे असल्याचे उद्गार अपर्णा यांनी काढले आहेत.

आमच्या पूर्वजांनी राम जन्मभूमीसाठी लढाई लढली आहे. भगवान राम आमच्या देशाचे चरित्र निर्धारित करतात. स्वतःहून पुढे येत मंदिरासाठी शक्य तितकी मदत करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे अपर्णा यांनी म्हटले आहे.

Related Stories

स्पेशालिटी रेस्टॉरंट्सचा समभाग विक्रमी स्तरावर

Patil_p

प्रत्यक्ष पुराव्याची अनिवार्यता नाही!

Patil_p

सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणासाठी निर्मला सीतारमण यांचे केले अभिनंदन

Archana Banage

जम्मू-काश्मीर, दिल्ली, मध्यप्रदेशात सीबीआयचे छापे

Patil_p

कोरोना उपचाराबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे

Patil_p

नव्या संसद इमारतीचे 10 डिसेंबरला भूमिपूजन

Patil_p