Tarun Bharat

मुलासाठी जंगजंग पछाडणारा पिता

24 वर्षांनी मुलाशी झाली भेट : अपहृत मुलाच्या शोधाकरता धडपड भीषण अपघात, भीकही मागितली

चीनच्या शेडोंग प्रांतात 24 वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या एका मुलाशी त्याच्या आईवडिलांची झालेली भेट अत्यंत भावुक करणारी ठरली. मुलाचे अपहरण करण्यात आले तेव्हा त्याचे वय केवळ 2 वर्षे होते. पोलिसांच्या मदतीने त्याला शोधेपर्यंत त्याचे वय 26 वर्षे झाले आहे. त्याच्या आईवडिलांनी त्याला धावत जाऊन कवटाळले आणि रडू लागले. हे पाहून तेथे उपस्थित इतरांचे डोळेही पाणावले.

जीव जोखिमीत टाकला

वडिल गुओ गंगतांग यांना हा क्षण अधिकच आनंद देणारा होता, कारण त्यांची तपस्या पूर्ण झाली होती. त्यांनी 20 प्रांतांमध्ये मुलाचा शोध घेतला, जेथे कुठे शक्यता वाटेल तिथे ते स्वतःच्या दुचाकीने पोहोचायचे. अशाप्रकारे त्यांनी सुमारे 5 लाख किलोमीटर अंतर कापले आहे. यादरम्यान त्यांना 10 बाईक्स बदलाव्या लागल्या. एक भीषण अपघातात अनेक हाडांचे प्रॅक्चर झाले, एकदा लुटारूंनी गोळीबार केला तरीही ते डगमगले नाहीत.

प्रसंगी भिकही मागली

वडिल गुओ बाइकवर मुलाच्या छायाचित्राचा बॅनर लावून प्रवास करायचे. मुलाच्या शोधाकरता त्यांनी स्वतःकडील पूर्ण गंगाजळी संपविली. प्रसंगी भिकही मागितली, अनेकदा पुलाखाली झोपले, पण हार मानली नाही. त्यानंतर चीनमध्ये बेपत्ता लोकांसाठीच्या संघटनेचे प्रमुख सदस्य झोल. त्यांनी 7 अन्य पालकांना त्यांच्या अपहृत मुलांची भेट घडवून आणण्यास मदत केली आहे.

चित्रपटाची निर्मिती

मुलाला शोधण्यासाठी गुओ यांचे प्रयत्न पाहता 2015 मध्ये ‘लॉस्ट अँड लव्ह’ हा चित्रपट तयार करण्यात आला, यात हाँगकाँगचा सुपरस्टार एंडी लाउने काम केले.

देशभरात डीएनए चाचणी

चीनमध्ये अपहृत किंवा हरवलेल्या लोकांच्या शोधासाठी पोलिसांनी यंदा व्यापक मोहीम राबविली आहे. यात कुटुंबीयांचा शोध लावण्यासाठी डीएनए चाचणीची मदत घेतली जात आहे. गुओ यांचा मुलगा देखील डीएनए चाचणीमुळेच मिळू शकला आहे. गुओ यांच्या मुलाचे अपहरण करण्याप्रकरणी एक महिला आणि तिच्या सहकाऱयाला अटक करण्यात आली आहे. त्यांनी मुलाला हेनान प्रांतात विकले होते. चीनमध्ये बालतस्करी मोठी समस्या आहे.

Related Stories

तुर्कस्तानच्या खोऱयांमध्ये हॉट एअर बलून टूर

Patil_p

दिवाळीत 72 हजार कोटींची उलाढाल, चीनला नुकसान

Patil_p

ब्रिटनमध्ये नवा ट्रेंड ‘5ः2 डायट’

Patil_p

अमेरिका : 83,425 बळी

Patil_p

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे देणार राजीनामा

datta jadhav

अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य

datta jadhav