Tarun Bharat

मुलीच्या छेडछाडीवरुन विक्रेत्यांच्या मारामारी

Advertisements

जिल्हा रूग्णालयात मुलीच्या नातेवाईकांवर उपचार सुरू

प्रतिनिधी /सातारा

साताऱयात अल्पवयीन मुलीची छेड का काढली म्हणून विचारायला गेलेल्या पीडित मुलीची आई व मामाला मुलाच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केली. परराज्यातून आलेल्या विक्रेत्यांमध्ये बुधवारी रात्री बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दोन गटात झालेल्या भांडणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या घटनेची तक्रार रात्री उशिरापर्यंत पोलिसांत दाखल झालेली नव्हती. या घटनेतील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱयात परराज्यातून विक्रेते आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे विक्रेते एकाच ठिकाणी राहत आहेत. यातील एका विक्रेत्यांची अल्पवयीन मुलगी बुधवारी रात्री 9.15 वाजता दुकानात दूध आणायला गेली होती. यावेळी दुसऱया विक्रेत्यांनी व त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनी मुलीची छेड काढली. तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याची माहिती अल्पवयीन मुलीने आईला व मामाला दिली. मुलीबरोबर असे वर्तन का केले याची विचारणा करायला गेलेल्या आईला व मामाला छेड काढणाऱयाकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

युवतीला वारंवार त्रास

हे विक्रेते दररोज मद्य प्राशन करतात. तसेच गांजा व इतर अंमली पदार्थाचे सेवन करतात. या ठिकाणी इतर महिलांना वांरवार त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक अवैध धंदे येथे सुरू आहेत. मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. तसेच या अल्पवयीन मुलीला ही अनेकवेळा त्रास देण्यात आला आहे. परंतु यांच्या विरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलीसही यांची दखल घेत नसल्याचे या अल्पवयीन मुलीकडून सांगण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीच्या पाठीशी रिपाइं

अल्पवयीन मुलीसोबत घडलेली छेडछाडीची घटना रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जावून मुलीची व कुटुंबाची भेट घेतली. तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

Related Stories

बेकायदा पिस्टल बाळगणाऱया तिघांना अटक

Patil_p

सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी निगेटिव्ह

Patil_p

सुशांत सिंह प्रकरणात सत्य बाहेर येईल

Patil_p

125 पैकी 4 व्यावसायिक बाधित

Patil_p

जिल्हय़ात धुवाँधार, कोयनेतून कोणत्याही क्षणी विसर्ग

Patil_p

बँक खासगीकरणा विरोधात बँका बंद

Patil_p
error: Content is protected !!