Tarun Bharat

मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची पित्याने कोर्टाबाहेर गोळ्या घालून केली हत्या

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एका नराधमाने १६ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. मात्र पीडित मुलीच्या पित्याने बलात्कार करणाऱ्या त्या २५ वर्षीय आरोपी तरुणाची कोर्टाबाहेर गोळ्या घालून हत्या केली. आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याने संतप्त झालेल्या पित्याने परवाना असणाऱ्या आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडत या आरोपीची हत्या केली. ते एक लष्करातील निवृत्त जवान आहेत.

दरम्यान, १६ वर्षीय मुलीचं अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या २५ वर्षीय आरोपी तरुणाची कोर्टाबाहेर पीडित मुलीच्या पित्याने गोळ्या घालून हत्या केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर कोर्टाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी पीडित मुलीच्या पित्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पार्किंगमध्ये आपल्या वकिलाची वाट पाहत थांबलेला असतानाच आरोपीने डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्यानंतर लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केली. पोलीस काही वेळाने तिथे पोहोचले होते. पोलिसांनी शस्त्र ताब्यात घेतलं आहे.

“या गुन्ह्यात फक्त पित्याचा सहभाग नाही,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटल्याची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आरोपी कोर्टात आला होता. त्याने आपल्या वकिलाला फोन करुन कोर्टाच्या गेटजवळ बाईक पार्किगमध्ये वाट पाहत असल्याचं सांगितलं होतं. निवृत्त लष्कर जवान यावेळी तिथेच उपस्थित होता. त्याने आरोपीवर गोळ्या झाडून हत्या केली.

Related Stories

झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाबरोबर विद्यापीठाचा सामंजस्य करार

Abhijeet Khandekar

उत्तर प्रदेश : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा

Rohan_P

राजस्थानात मंदिरावर ‘बुलडोझर’

Patil_p

देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना भाषणापासून डावललं

datta jadhav

सोने गरम, शेअरबाजार गार

Patil_p

फुटबॉलच्या सामन्यादरम्यान कोसळली प्रेक्षक गॅलरी, 200 हून अधिक जखमी

datta jadhav
error: Content is protected !!