Tarun Bharat

मुश्फिकूर रहिमची विनंती बांगलादेश मंडळाने फेटाळली

Advertisements

वृत्तसंस्था/ ढाका :

बांगलादेशमधील कोरोना परिस्थितीमध्ये बऱयापैकी सुधारणा होत आहे. दरम्यान, मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याची माजी कर्णधार मुश्फिकूर रहिम आणि अन्य काही वरि÷ क्रिकेटपटूंची विनंती बांगलादेश क्रिकेट मंडळाने फेटाळून लावली आहे.

मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्याकरिता अद्याप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे घाईने प्रशिक्षण सुरू केले तर ते खेळाडूंची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सध्याच्या स्थितीत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणे योग्य नाही, असे बांगलादेश मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. रहिमने या संदर्भात बांगलादेश मंडळाशी यापूर्वीच संपर्क साधला होता. पण प्रशिक्षण सुरू करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे मंडळाकडून त्याला सांगण्यात आले. क्रिकेटपटूंना सरावाची अत्यंत गरज असल्याचे मंडळाने मान्य केले. पण रहिमने आपल्या निवासस्थानी क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यावे, असे मत मंडळाने मांडले. प्रशिक्षणापेक्षा खेळाडूंच्या सुरक्षेची अधिक चिंता असल्याने यामुळे क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यास रहिमला बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून नकार देण्यात आला आहे.

बांगलादेशमधील कोरोनाच्या स्थितीमध्ये खूपच फरक पडला आहे. पण क्रीडा हालचाली सुरू करण्याची घाई करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले. आयसीसीच्या नियमावलीनुसारच बांगलादेश क्रिकेट मंडळ आपल्या संघासाठी प्रशिक्षण सुरू करेल, अशी ग्वाही मंडळाच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

स्पेनचा नदाल उपांत्य फेरीत

Patil_p

सचिनच्या ‘परफॉर्मन्स-बेस’ आयपीएल संघात ना रोहित, ना विराट!

Patil_p

कोलकात्यात खेळताना प्रचंड दडपण असायचे : छेत्री

Patil_p

मेक्सिकोला नमवत ब्राझील अंतिम फेरीत

Patil_p

रोनाल्डोचा विक्रमी गोल, पोर्तुगाल विजयी

Amit Kulkarni

अन् त्याने डोंगरमाथ्यावरुन सामना पाहिला!

Amit Kulkarni
error: Content is protected !!