Tarun Bharat

मुस्लिमांचे झुंडबळी हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा परिणाम

Advertisements

सरसंघचालक भागवतांना ओवेसींच प्रत्युत्तर

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमा दरम्यान हिंदू – मुस्लीम वेगळे नाहीत त्यांचा डीएनए एकच आहे. झुंडबळीसाठी सरसावणारे लोक हिंदू नाहीत, ते हिंदूत्वविरोधी आहेत. हिंदू – मुस्लीम ऐक्याची नितान्त आवश्यकता आहे, असे सांगत भागवत यांनी ऐक्यासाठी आवाहनही केलं होते. मोहन भागवत यांच्या या विधानांवरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांना ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुस्लिमांचे झुंडबळी हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा परिणाम आहे. झुंडबळीतील गुन्हेगारांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक कळत असेल, पण हत्या करण्यासाठी जुनैद, अखलाक़, पहलू, रकबर, अलीमुद्दीन यांचीच नावे पुरेशी आहेत. या गुन्हेगारांना हिंदूत्वादी सरकारचे पाठबळ आहे, असा आरोप ओवेसी यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अलीमुद्दीनच्या गुन्हेगारांना हार घातला जातो. त्याचे आदरातित्य केले जाते. हत्या करणाऱ्याच्या मृतदेहावर तिरंगा पांघरला जातो. महापंचायतमध्ये भाजपचा प्रवक्ता म्हणतो की, आम्ही हत्या पण करु शकत नाही का ? भित्रेपणा, हिंसा, हत्या हे गोडसेंच्या हिंदूत्वादी विचारांचाच अविभाज्य घटक आहे. आणि मुस्लिमांचे जाणारे झुंडबळी याचं विचारांनी प्रोत्साहीत झाले आहेत, असे ट्वीट करत सरसंघचालक असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार घेतला आहे.

Related Stories

भाजपचे पुण्यात ‘सेल्फी विथ कोरोना फायटर अभियान’

Tousif Mujawar

सलग तीन दिवस कोसळणाया धुवाँधार पावसाने जनजीवन विस्खळीत

Patil_p

12 वी उत्तीर्णांना ड्रोन पायलट होण्याची संधी

Patil_p

नाशिक : लहवित जवळ पवन एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन घसरले

Archana Banage

नारदा केस : दोन मंत्र्यांसह टीएमसीच्या चार नेत्यांना अटक; नाराज ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात

Tousif Mujawar

शरद पवारांनी घेतली अमित शहांची भेट

Archana Banage
error: Content is protected !!