Tarun Bharat

मुस्लीमवाडा डिचोली येथील क्रॉस गटरची भर पावसात दुरूस्ती.

पाण्याचा निचरा सुरळीत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष. अखेर नगरपालिकेलाच यावी लागली जाग.

डिचोली / प्रतिनिधी

   मुस्लीमवाडा डिचोली येथील रोलींग मिलजवळ जाणाऱया रस्त्याच्या जंक्शनवर दर पावसाळय़ात क्रॉस गटर तुंबल्याने भरणारे पाणी नगरपालिकेला उशीरा आलेल्या जागेनंतर सुरळीत झाले. या कामाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्या जबाबदारीकडे साफ दुर्लक्ष केल्यानंतर उशीरा का होईना डिचोली नगरपालिकेला जाग यावी लागली. त्यानंतरच सदर काम करून पावसाळी पाण्याचा सुरळीत निचरा करून देण्यात आला.

  मुस्लीमवाडा येथून रोलींग मिलजवळ जाणाऱया रस्त्याच्या जंक्शनवर रस्त्याखालून असलेले गटर तुंबले होते. गेल्या वषीही पावसाळय़ात जोरदार वृष्टी झाल्यानंतर या भागात रस्त्यावर पाणी साचय होते. त्यामुळे या महामार्गावरून ये जा करणाऱया वाहनांमुळे ते लोकांच्या अंगावर उसळत होते. तसेच रस्त्यावर पूर्णपणे चिखलमिश्रीत पाणी भरल्यानंतर या रस्त्यावरून णालत जाणेही लोकांसाठी अवघड बनत होते. याबाबतचे वृत्त गेल्यावषी दै. तरूण भारतने प्रसिध्द केले होते. मात्र या कामासाठी संबंधित असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने शेवटपर्यंत या कामाकडे दुर्लक्षच केले होते.

यावषीही तिच परिस्थिती

  सदर क्रॉस गटरची खालून साफसफाई करण्यात न आल्याने यावषीही तिच परिस्थिती उदभवणार आणि पावसाचे पाणी रस्त्यावरूनच जाणार याबाबत लोकही ठाम होते. आणि झालेही तसेच, सोमवारपासून पावसाला दमदार सुरूवात झाल्यानंतर या गटरातील पाणी तुंबून चिखलासह रस्त्यावरून वाहू लागले. राज्य महामार्गाच्या या कामाणी यावषीही सार्वजनिक बांधकाम खात्याने जबाबदारी झटकल्याचे दिसून आले. या परिस्थितीसाठी लोकांनीही बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना शिव्यांची लाखोली वाहिली.

अखेर नगरपालिकेला आली जाग…

   मुस्लीमवाडा येथील सदर गटरातील पाण्याचा विषय सर्वत्र झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात जाग न आलेल्या डिचोली नगरपालिकेला भर पावसात गटर दुरूस्त करण्याची जाग आली. डिचोली नगरपालिकेचे मुस्लीमवाडा येथील नगरसेवक निसार शेख यांनी पुढाकार घेत सदर क्रॉस गटर वक्रोलोडर यंत्राच्या सहाय्याने खोदून सर्वप्रथम गटर साफ करून घेतले. व नंतर सदर गटराच्या खालच्या भागात पाईप घालून त्यातून पाण्याचा निचरा करून दिला. या अर्ध्या दिवसाच्या कामामुळे या भागातील सदर समस्या एका दिवसात सुटली. हि समस्या गेल्या वषीही उदभवली होती. मात्र त्यावेळी सदर काम जर सार्वजनिक बांधकाम खाते करीत नसल्यास लोकांची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आताच्या प्रमाणे गेल्याच वषी किंवा पावसाळय़ापूर्वी नगरपालिकेतर्फे सोडविण्याची साधी तसदी घेतली असती तर यावषी लोकांसमोर समस्या राहिलीच नसती. यावरून एखाद्या कामासाठी दुसऱयांची वाट पाहणे आणि तोपर्यंत लोकांना समस्येला सामोरे जाऊ देणे. या प्रकाराचा प्रत्यय आला.

आडव्या केबल्समुळे गटर तुंबते

या गटराच्या आतून आडवा जियो, बिएसएनएल व युटीआय असे तीन केबल असल्याने सदर गटर तुंबते. सदर केबल पाण्याचा प्रवाहात आडवे असल्याने गटरात येणारा कचरा त्याला अडकून राहतो आणि गटर पूर्णपणे ठप्प होते. सदर केबल असलेल्या कंपन्यांना सांगूनही ते सदर केबल जरा वर काढण्याची सुचना मानत नाही. त्यामुळे लोकांना नाहक त्रास सोसावे लागत आहे. स्थानिक नगरसेवक निसार शेख यांनीही सदर केबल हलविण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले, मात्र सदर कंपन्याच दाद देत नसल्याने सदर केबल जैसे थे स्थितीत आहेत. तसेच सदर गटर दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे होते. मात्र त्यांनी हात झटकल्याचे लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नगरपालिकेतर्फे गटर दुरूस्तीचे काम करण्यात आल्याचे नगरसेवक निसार शेख यांनी सांगितले.

Related Stories

दहावी परीक्षेचा निणर्य योग्यच

Omkar B

हरवळे धबधब्यात बुडून मृत्यूप्रकरणी पर्यटक खाते जबाबदार नव्हे

Amit Kulkarni

वास्को शहरासह मुरगाव तालुक्यात स्वेच्छा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

कारमधील किमती वस्तू चोरणाऱया टोळीचा पर्दाफाश

Amit Kulkarni

आयआयटी प्रस्तावित जागेतील झाडांची कत्तल

Omkar B

अध्यायन अध्यापन प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धती

Omkar B