Tarun Bharat

मुस्लीम लीग काँग्रेस असं नाव कराव : संबित पात्रा

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

काँग्रेस नेते अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्र घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, मुस्लिंमाना गोंजरण्यासाठी काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला. मुस्लिमांचाही राजकारणासाठी सोयीस्कर वापर केला गेला. त्यामुळे काँग्रसचं नाव आयएनसी नव्हे तर एमएलसी करायला हवं, मुस्लीम लीग काँग्रेस असं नाव करावा असं त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, समझोता एक्सप्रेस स्फोटाच्यावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद शब्द उल्लेख केला होता. 1949 मध्ये काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा विरोध केला तेव्हापासून आजतागायत राम मंदिर उभं राहिलं नाही. काँग्रेसने नेहमी हिंदू विरोधात काम केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, मुस्लीम त्यांचे पूर्वज कुठे दफन केले गेले होते ते मुस्लमि सांगू शकतात परंतु त्यांच्या हिंदू पूर्वजांचे अंतिम संस्कार कोठे झाले हे हिंदू सांगू शकणार नाहीत. हे इतके अपमानजनक आहे. हे राजकारणाचे कोणते रूप आहे? असा सवाल संबित पात्रांनी केला.

 

Related Stories

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

Archana Banage

रॉ, सैन्यप्रमुख यांच्यानंतर विदेश सचिवांचा नेपाळ दौरा

Patil_p

कोण लिहितं मोदींचं भाषण?

datta jadhav

विवाहित हिंदू महिलेच्या संपत्तीवर माहेरच्या नातेवाईकांचाही अधिकार

Amit Kulkarni

लोकोपायलट मुरुगन यांच्या प्रसंगावधामुळे टळला रेल्वे अपघात

prashant_c

लोकांच्या उपयोगाची उत्पादने निर्माण करा !

Patil_p
error: Content is protected !!