Tarun Bharat

मृतांचा टक्का घसरला

बाधितांचा आकडा साडे एकावन्न हजारानजिक, 106 जणांना डिस्चार्ज

प्रतिनिधी/ सातारा

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी जिह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा हा 51 हजार 225 वर सकाळी होता तर रात्री आलेल्या अहवालात…. वाढ होऊन 51 हजार 500 च्या समीप बाधितांजवळ पोहचला आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे, नियम पाळणे जरुरीचे बनले आहे. मृतांचा टक्काही आता कमी होत असून जिल्हावासीयांनी कोरोनावरील लसीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

सातारा जिह्यातील आजपर्यंत 2 लाख 49 हजार9 जणांचे स्वॅब तपासण्या झाल्या आहेत. त्यात आज सकाळपर्यंत 51 हजार 225 एवढे बाधित होते. तर उपचार घेऊन बरे झालेल्या 48हजार 693 जणांना सकाळपर्यंत घरी सोडण्यात आले. तर मंगळवारी दिवसभरात 106 जणांना घरी सोडले. आजपर्यंत 1 हजार 719 जणांचे बळी कोरोनाने घेतले असून मंगळवारी केवळ एकाचा बळी गेला आहे. 813 रुग्ण उपचारार्थ आहेत. डिसेंबर हा वर्षांचा शेवटचा महिना आहे. गेली सव्वा नऊ महिने कोरोनाने अक्षरशः नको नको केले. सुरुवातीला कडक लॉकडाऊन अन् नंतर ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान जिह्यात वाढलेला कहर. या आठवणी अंगावर शहारे प्रत्येकाच्या आणतात. आता जरी कोरोनाचा विळखा सैल झाला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सातारा, माण, खटाव, फलटण या तालुक्यातील बाधितांचा आकडा दोन आकडय़ात आहे तर वाई, महाबळेश्वर, पाटण, कराड, कोरेगाव, खंडाळा हे तालुके सावरू लागले आहेत. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात चांगल्या वार्ता कानी पडू दे यासाठी प्रत्येकांनी आपल्याला नियम पाळणे अजून गरजेचे आहे. जोपर्यंत यावर लस निघत नाही तोपर्यंत जरा काळजी घेतली पाहिजे, असेच प्रत्येकाला वाटू लागले आहे.

106 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 106 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 305 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

305 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 33, कराड येथील 22, फलटण येथील 17, कोरेगांव येथील 14, वाई येथील 18, खंडाळा येथील 12, रायगांव येथील 17, पानमळेवाडी येथील 50,  महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 12, खावली येथील 44 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 61 असे एकूण 305 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे. खासगी हॉस्पीटलमध्ये विहे ता. पाटण येथील 77 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Related Stories

मागेल त्याला कोरोनाची लस द्या; अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी

Tousif Mujawar

वनविभाग जागा होतोय फक्त बिबटय़ाचा हल्ला झाल्यावरच…

datta jadhav

प्रविण ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यभेद करुन इतिहास रचणार?

Patil_p

धावपटू सुदेष्णाची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात निवड

datta jadhav

कोल्हापूर : लग्न समारंभात चोऱ्या करणाऱ्या एकास अटक

Archana Banage

संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठा बहरल्या

Patil_p