Tarun Bharat

मृतावस्थेत आढळलेल्या जनावरांचा केला अंत्यसंस्कार

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील भटकी जनावरे पकडण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात येते. पण मृतावस्थेत आढळलेल्या जणावरांवर अंत्यविधी करण्याची जबाबदारी देखील या विभागातील कर्मचारी पार पाडत आहेत. बळ्ळारी नाल्यालगत मृतावस्थेत आढळलेल्या म्हैस आणि गाईवर अंत्यविधी करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच गुरूवारी श्रीनगर परिसरात भटकी जनावरे पकडुन गोशाळेत दाखल करण्यात आले.

शहर परिसरात भटक्मया जनावरांमुळे होणारे उपद्रव थांबण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येतात. ठिकठिकाणी जनावरे ठाण मांडून बसल्याने वाहतुकीस अडथळा होतो. त्यामुळे अशा जनावरांना पकडुन गोशाळेत दाखल केले जाते. त्याच प्रमाणे जखमी अवस्थेत आढळलेल्या जनावरांवर औषधोपचार करून गोशाळेत ठेवण्यात येते. पण मृत जनावरांवर अंत्यविधी करण्याचे कार्य देखील मनपाच्या पशु संगोपन विभागाने केले आहे. आजवर केवळ  जनावरे पकडण्याची कारवाई करण्यात येत होती. पण येडियुरप्पा रोड जवळ बळ्ळारी नाल्याच्या काठावर दोन जनावरे मृतावस्थेत असल्याचे शेतकऱयांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे तक्रार करून जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. सदर जनावरे त्याच ठिकाणी कुजुण्याची शक्मयता होती. त्यामुळे नाल्याशेजारी खड्डे काढून शेतकऱयांच्या मदतीने मनपाच्या पशुसंगोपन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने मृत जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यात आला.

श्रीनगर परिसरात भटक्मया जनावरांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांचा उपद्रव टाळण्यासाठी गुरूवारी जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात आली. दोन जनावरे पकडुन गोशाळेत दाखल करण्यात आली.

Related Stories

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 9 जानेवारी रोजी भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट कॅबिनेटचा अधिकारग्रहण

Amit Kulkarni

सराफ व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Amit Kulkarni

तरुण भारत निपाणी कार्यालयाचा आज वर्धापन दिन

Amit Kulkarni

नवी ऊर्जा घेऊन दौडची सांगता

Patil_p

घरावर भगवा झेंडा लावून शिवराज्याभिषेक दिन साजरा करा

Patil_p
error: Content is protected !!