Tarun Bharat

मृत माजी नायब सुभेदार यांच्या कुटुंबीयाला मदत

Advertisements

वार्ताहर / किणये

माजी सैनिक संघटना किणये यांच्यावतीने गावातील निवृत्त नायब सुभेदार बाळकृष्ण पाटील यांच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे.

किणये गावातील निवृत्त नायब सुभेदार यांचे गेल्या महिन्याभरापूर्वी निधन झाले. त्यांनी देशासाठी केलेले कार्य व त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लागावा या उद्देशाने गावातील निवृत्त माजी सैनिक संघटनेने हा उपक्रम राबविला आहे.

बाळकृष्ण पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे देशसेवा बजावली. निवृत्तीनंतर त्यांचे निधन झाले असले तरीही आपला एक सहकारी मित्र गमावल्याचे दुःख निवृत्त सैनिक संघटनेला झाले. व त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांसाठी मदत व्हावी म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले.

कै. नायब सुभेदार बाळकृष्ण पाटील यांच्या पत्नी गीता पाटील यांच्याकडे पाच हजार रुपये देण्यात आले. यावेळी किणये माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

फ्रेंड्स फाऊंडेशन ग्रुपचे समाजोपयोगी कार्य

Amit Kulkarni

आज बाजारपेठेसह सर्व व्यवहार सुरू राहणार

Patil_p

विजेच्या धक्क्याने मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

Patil_p

जलवाहिन्यांच्या कामामुळे हिंदवाडीतील रस्ता बंद

Amit Kulkarni

होनगा मार्कंडेय पुलाच्या सर्व्हिस रोडवर कचरा

Amit Kulkarni

धारवाडनजीक भीषण अपघातात 11 ठार

Patil_p
error: Content is protected !!