Tarun Bharat

मॅट फसवणूक प्रकरणी नुकसान भरपाई दावा करणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

मॅट फसवणूक प्रकरणी ग्राहक न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल कण्यात येणार आहे. बुधवारी शिक्षण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती प्रविण यादव होते.

 भगवान पाटील, रसिका पाटील, विनय पाटील, स्मिता शेंडूरे, तानाजी पोवार, सतीश बरगे, धोंडीराम पाटील यांनी प्रत्यक्षरित्या सभेमध्ये सहभागी होत्या व  वंदना जाधव, अनिता चौगुले, प्रियांका पाटील, सुकुमार पाटील व सर्व गटशिक्षण अधिकारी यांनी ऑनलाईन सहभाग घेतला, सदर सभेमध्ये खालीलप्रमाणे विषयनिहाय चर्चा करणेत आली .

मॅट खरेदी फसवणूक संबंधी ग्राहक न्यायालयात का दाखल केली नाही. असा सवाल वंदना जाधव यांनी उपस्थित केला. त्याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा होऊन ग्राहक न्यायालयात जि.प. ची फसवणूक झालेले नुकसान कारवाई मिळणेबाबतचा दावा दाखल करावा असे ठरले. शाळा सुरु करणे संदर्भात शासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत. 

5 वी चा वर्ग जोडणेबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील पूर्णत: कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेनंतर 1 नोव्हेंबर 2020 पासून शाळा सुरु होतील. याचे नियोजन आतापासूनच करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. शिक्षकांना आगावू चेतनवाढी संदर्भात कोरोना संपल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर करणेच्या सूचना सभापती यादव यांनी दिल्या.

Related Stories

कोरोना योध्द्यांना दिवाळी भेट

Archana Banage

मर्डरला वर्ष पूर्ण; गुन्हेगारांकडून दुसऱ्या वादाची तयारी सुरु

Archana Banage

सीपीआर मधील लिपीक लाचलुचपतच्या जाळयात

Archana Banage

गांधीनगरात चाकू हल्ला, परस्परविरोधी फिर्यादी दाखल

Archana Banage

त्यागाचा संदेश देणारा नाताळ सण

Archana Banage

इचलकरंजी महापालिकेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!