ऑनलाईन टीम / मुंबई
आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपने आता शवासन करावं, अशी जहरी टीका भाजपवर केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकेला उत्तर देताना संताप व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यावर टिकेची तोफ डांगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने धगधगतायत अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या या ट्विट्मध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत, मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे.” अशा शब्दात टिकास्त्र सोडले.

