Tarun Bharat

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.18 लाखांवर

Advertisements

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत आतापर्यंत 13 लाख 20 हजार 545 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 18 हजार 202 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

रविवारी या देशात 12 हजार 129 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 627 जणांचा मृत्यू झाला. 13.20 लाख रुग्णांपैकी 9 लाख 78 हजार 002 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 24 हजार 341 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 3890 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 33 लाख 77 हजार 517 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

दफनभूमीत भाडेतत्वावर मिळतेय जागा

Patil_p

निर्बध शिथिल

Patil_p

इयान वादळावरून फ्लोरिडात आणीबाणी

Patil_p

चंद्राच्या कक्षेतील बदलामुळे येणार पाऊस -पूर

Patil_p

रशियाचे सैनिक होऊ लागले हताश

Patil_p

जपानमध्ये कोरोनाची लाट परतणार, प्रशासन झालं सतर्क

Patil_p
error: Content is protected !!