Tarun Bharat

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 83 हजारांवर

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत आतापर्यंत 8 लाख 09 हजार 751 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 83 हजार 507 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

मेक्सिकोत शुक्रवारी 5300 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 370 जणांचा मृत्यू झाला. 8.09 लाख रुग्णांपैकी 5 लाख 88 हजार 085 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 38 हजार 159 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2537 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात नववा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 20 लाख 68 हजार 647 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

सिंगापूरमध्ये रूग्णांमध्ये वाढ

Patil_p

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, 3 ठार

Amit Kulkarni

ट्रम्प यांच्यावर बायडन संतापले

Patil_p

चर्चिलच्या चित्राचा विक्रमी लिलाव

Patil_p

आजारामुळे झाला विश्वविक्रम

Amit Kulkarni

मेक्सिकोत आता गर्भपात गुन्हा नव्हे : सर्वोच्च न्यायालय

Amit Kulkarni