Tarun Bharat

मेघोली तलाव शेती पंचनामे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध – शेतकरी आक्रमक

योग्य मोबदला मिळणार असेल तरच पंचनामे करा ;

प्रतिनिधी / गारगोटी

भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, महसुल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असेल, तर ती स्वीकारणार नाही. आधी सर्व क्षेत्राची मोजणी करा त्याबरोबरच योग्य मोबदला मिळणार असेल तरच पंचनामे करा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासमोर घेतला.

शेतकऱ्यांच्या जमिनी बांध तुटून गेल्याने माती व दगड-गोटे पडून एकत्र झाल्या आहेत.जमिनीचे क्षेत्र कोणाचे व किती हे देखील कळणार नाही. त्यासाठी जमिनीची मोजणी शासनाने आधी करावी. तसेच योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
यावर खासदार संजय मंडलिक, भुदरगडचे आमदार प्रकाश अबीटकर, अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. मदतीचे ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास सांगितले.

दरम्यान, मेघोली लघु पाटबंधारे तलावाच्या व्हॉलमधील गळतीमुळे बुधवारी रात्री धरण फुटले. २२ जुलैरोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पूर्वीच असणारी व्हॉलमधील गळती वाढत चालली होती. याबाबतची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी मेघोलीसह सोनुर्ली, नवले, तळकरवाडी, ममदापूर व वेंगरुळ येथील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

‘दीपाली चव्हाण प्रकरणी आरोपी शिवकुमारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा’

Archana Banage

सत्यजीत तांबेंनी भूमिका केली स्पष्ट , म्हणाले,अपक्षच राहणार…

Archana Banage

शिंदे सरकार असंवेदनशील

Patil_p

राजधानीत झाली शिवमय

Patil_p

नालासोपाऱ्यातून जहाल नक्षलवाद्याला अटक, 15 लाखांचं होतं बक्षीस

datta jadhav

शॉक लागून चुलत भावांचा मृत्यू

Patil_p