Tarun Bharat

मेट्रो 3 स्थानकांच्या नाम अधिकार हक्कांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

बीकेसी स्थानकास सर्वाधिक पसंती

मुंबई / प्रतिनिधी

 मेट्रो 3 मार्गावरील स्थानकांच्या नावाचे अधिकार हक्क मिळवण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. एकूण 28 नामांकित ब्रँडस मेट्रो 3 स्थानकांच्या नावाचे अधिकार हक्क घेण्यास उत्सुक असून काही कंपन्यांनी एकाहून अधिक स्थानकांच्या नाम अधिकारासाठी स्वारस्य दाखवले आहे.

  विविध कंपन्याद्वारे 18 स्थानकांसाठी एकूण 87 स्वारस्य अर्ज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी शहरातील अत्यंत महत्त्वाचे व्यापारी पेंद्र समजल्या जाणाऱया बीकेसी स्थानकासाठी सर्वाधिक 12 स्वारस्य अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दादर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकांसाठी प्रत्येकी नऊ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नंतर स्थानिक विमानतळ व सीएसएमटी स्थानकाकरिता प्रत्येकी सात अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये एलआयसी, इंडियन ऑईलसारख्या सार्वजनिक उपक्रम संस्था आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यूटीआय, कोटक, आयडीएफसी, फर्स्ट, एचएसबीसी बँक, इंडिगो, स्पाइस जेट,  जेएसडब्लू., ग्लॅक्सो स्मिथक्लाईन, टाइम्स समूह, ब्लॅकस्टोन, फिनिक्स मिल्स, पिरामल, ओबेरॉय, डी. बी. रिअल्टीसारख्या कंपन्यांप्रमाणेच इतरही अनेक नामवंत कंपन्या आहेत. या सर्व स्वारस्य अर्जाची प्रक्रिया एमएमआरसीच्या नॉन फेअर रेव्हेन्यू सल्लागार ऑक्ट्स ऍडव्हायझर स्टुडिओ-पीओडीव्दारे राबविण्यात आली आहे.

 तिकीट-भाडे व्यतिरिक्त मिळणारे महसूल कुठल्याही वाहतूक व्यवस्थेच्या शाश्वत कार्यान्वयनासाठी अतिशय महत्त्वाचे असते. यामुळे तिकिटाचे दर नियंत्रणात ठेवणे शक्य होते. स्थानकांच्या नाम अधिकाराद्वारे मिळणारा महसूल महत्त्वाचा स्त्रोत असेल. विविध नामांकित कंपन्यांद्वारे यास मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

रणजीतसिंह देओल

व्यवस्थापकीय संचालक

एमएमआरसी

Related Stories

राज ठाकरेंना सरकार घाबरले, काँग्रेस नेत्याचा महाविला घरचा आहेर

Rahul Gadkar

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला

Rohan_P

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6603 नवे कोरोना रुग्ण; 198 मृत्यू

Rohan_P

हुबळीत भीषण अपघातात ८ ठार, मृत्यूमधील ६ जण कोल्हापुरातील?

Rahul Gadkar

मंत्री मुश्रीफांचा सोमय्यावर 100 कोटीचा दावा

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री पदासाठी सेनेने केली भगव्याशी तडजोड : नितीन गडकरी

prashant_c
error: Content is protected !!