Tarun Bharat

‘मे’मध्ये निर्यात वाढली

वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी –  इंजिनिअरिंग, औषध, पेट्रोलियम उत्पादनांचा निर्यातीमध्ये समावेश

नवी दिल्ली

 देशाची निर्यात मे 2021 मध्ये 67.39 टक्क्यांनी वधारुन 32.21 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर राहिली आहे, अशी माहिती सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून सांगितली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या सुरुवातीच्या आकडेवारीच्या तुलनेत यावेळी इंजिनिअरिंग, औषध, पेट्रोलियम उत्पादन आणि रसायन आदींचा समावेश निर्यातीमध्ये राहिला असून तेजीची नोंद केली आहे.

मागील वर्षात मे महिन्यात निर्यात 19.24 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि मे 2019 मध्ये 29.85 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर राहिल्याची माहिती आहे. यासह मे 2021 मध्ये आयात ही 68.54 टक्क्यांनी वधारुन 38.53 अब्ज डॉलर्सवर स्थिरावली असून मे 2020 मध्ये 22.86 अब्ज डॉलर्सवर आयात राहिल्याची माहिती आहे.

व्यापारी तोटय़ात वाढ

वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मे 2021 भारताच्या व्यापारी तोटय़ात मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. मे 2020 च्या तुलनेमध्ये व्यापारी तोटय़ात 74.69 टक्क्यांची वाढ राहिली आहे.

Related Stories

LPG गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

फोन पे कर्मचाऱयांची संख्या करणार दुप्पट

Patil_p

मर्सीडीजची लक्झरी सुव्ह जीएलएस दाखल

Patil_p

एचसीएलकडून कर्मचाऱयांना दिलासा

Patil_p

‘ओयो’ची आगामी गुंतवणूक युरोपात होण्याचे संकेत

Patil_p

टीव्हीएस मोटारकडून मोबाईल ऍप लाँच

Patil_p