Tarun Bharat

मेरठमध्ये विद्युत विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला

ऑनलाईन टीम / मेरठ : 

मेरठमधील अलीपूर गावात शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यासाठी गेलेल्या विद्युत विभागाच्या पथकावर गावकऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला. गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत एसडीओ महावीर आणि कंत्राटी कामगार राजकुमार जखमी झाले आहेत. 

या घटनेनंतर कार्यकारी अभियंता नीरज सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 

पोलीस निरीक्षक अरविंद मोहन शर्मा यांनी लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन विद्युत कर्मचाऱ्यांना दिले आहे.

Related Stories

मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न

Patil_p

अभिनेते अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदी यांची प्रथमच राजे चार्ल्सशी चर्चा

Patil_p

विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून जाळपोळ

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाच्या मेलमध्ये अवतरले मोदी!

datta jadhav

जिलेटिनच्या भीषण स्फोटात 6 ठार

Patil_p
error: Content is protected !!