Tarun Bharat

मेरडा गावच्या महाबळेश्वर पाटील यांना वाढता पाठिंबा

नंदगड /  वार्ताहर

हलगा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी मेरडा व करजगी वॉर्ड क्र. 2 मधून महाबळेश्वर परशराम पाटील हे सामान्य गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असून निवडून आणण्याचे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात आले आहे.

मेरडा गावातील एक सामाजिक कार्यकर्ता ते हलगा ग्राम पंचायतीच्या राजकारणात सक्रिय असलेले महाबळेश्वर पाटील हे हलगा ग्राम पंचायतीचे माजी सदस्य आहेत. सामाजिक तळमळ व लोकसहभागामुळे त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पाणी योजना, वीज, स्मशान विकास, गावातील मंदिर सुशोभीकरण, संगमनगरमध्ये पाणी, रस्ते, वीज, करजगी गवळी वाडय़ात घरोघरी नळ कनेक्शन व काँक्रिटचे रस्ते आदी विकासकामे त्यांनी राबवली आहेत. लग्न, सभा समारंभाला टँकरद्वारे मोफत पाण्याची सोय करून दिली. शिक्षणाशिवाय माणसाचा विकास होत नाही. यासाठी मराठी शाळा टिकाव्यात म्हणून अंगणवाडी व प्राथमिक शाळेला येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांला दिवसाला एक रुपया ( शाळेला जा रुपया कमवावा) ही योजना सतत 5 वर्षे यशस्वीपणे राबवली. त्यांना कर्नाटक समाजसेवा रत्न पुरस्काराने 2018 साली सन्मानित करण्यात आले होते. मागील काळात केवळ राजकारण न करता संपूर्ण मेरडा-करजगी गावाच विकास करून घेण्यावर भर दिला. त्यामुळे दोन्ही ग्रामस्थांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय बनले असून प्रचारादरम्यान मतदारांचा लागणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांच्या कार्याची प्रचिती करून देते.

मंगळवार दि. 16 रोजी सायंकाळी त्यांनी आपल्या घरासमोरून प्रचाराला सुरुवात केली. या दरम्यान प्रत्येक मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन निवडून आणण्याची विनंती केली. यावेळी मतदारांनी देखील महाबळेश्वर पाटील यांना आपला भरघोस पाठिंबा दर्शवून प्रचंड मतानी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. यावेळी प्रचारात त्यांचे समर्थक व मतदार मोठय़ा संख्येने सामील झाले होते.

Related Stories

बेळगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 टक्क्मयाखाली

Omkar B

कारवार जिल्हय़ात 101 ग्राम पंचायतीसाठी आज मतदान

Patil_p

मसाज पार्लरवर पोलिसांची करडी नजर

Amit Kulkarni

खादरवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी

Amit Kulkarni

कामगार-कच्च्यामालाची कमतरता; उद्योग अडचणीत

Omkar B

जिल्हय़ाला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा

Amit Kulkarni