प्रतिनिधी / पणजी
तिसवाडी तालुक्यातील मेरशी पंचायती चे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक यांनी आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागल्याच्या जखमा आढळून आल्या प्रथमदर्शनी सदर प्रकार आत्महत्येचा वाटत असला तरी नाईक यांच्याकडे चिठ्ठी आढळून आली आहे. यात त्यांनी दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला असून ते आपली ब्लॅकमेलिंग व फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे. नाईक यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जुने गोवे पोलिस स्थानकावर गर्दी केली आहे.

