Tarun Bharat

मेरशी येथे जॅक सिक्वेरा यांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण

प्रतिनिधी /  पणजी :

मेरशी जंक्शन येथे जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ परिसराचे माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की जनमत कौल सरकारी पातळीवर साजरा करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर भाजपच्या आमदारांनी तर लोकांना शुभेच्छा दिल्याच नाहीत आणि आयात केलेल्या केवळ तीनच आमदारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सरकार जनमतकौल मान्य करत आहे की नाही हा प्रश्न खऱया अर्थाने उपस्थित होत आहे.

यावेळी माजी मन्न जयेश साळगांवकर, माजी मंत्री विनोद पालयेकर, आमदार टोनी फ्ढर्नांडिस, सरपंच, पंच आणि कोकणी कला केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणी कला केंद्र यांनी पुढाकार घेऊन जॅक सिक्वेरा यांचा पतुळा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या सहकार्याने उभारला आहे.

विजय सरदेसाई यांनी सांगितले की, हे सरकार गोमंतकीयांचे सरकाभ्Sिंप्sंAर नाही. हे सरकार भावनाशुन्य झाले आहे. 27 आमदार असल्याने आपलेच राज्य आणि हवे ते निर्णय आम्ही घेणार असा त्यांचा रोख त्यांनाच महागात पडणार.

टोनी फ्ढर्नांडिस यांनी सांगितले की, जॅक सिक्वेरे हे एक चांगल्याप्रकारे विरोध पक्षनेते होते. त्यांचा दरारा होता. त्यांची परंपरा आता आम्ही पुढे न्यायला हवी. मेरशी जक्शनवर जो आता पुतळा आहे त्याच्या बाजुचे रस्त्यांचे सौंदर्यिकरण करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार आहे.

Related Stories

विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा करणे गरजेचे

Amit Kulkarni

दूधसागरवर बुडालेल्या तरुणाचा शोध जारी

Amit Kulkarni

मैदानावर कोसळल्याने खेळाडूचा मृत्यू

Amit Kulkarni

जावडेकर यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे

Patil_p

किनारपट्टीवरील स्थानिक व्यावसायिकांना सतावू नका

Amit Kulkarni

शाळा 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार काय?

Amit Kulkarni
error: Content is protected !!