Tarun Bharat

मेरे देश की धरतीमध्ये दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

प्यार का पंचनामा, टॉयलेट एक प्रेम कथा, बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटांसोबत मिर्झापुर, बिच्छू का खेल या वेबसिरीजमध्ये  झळकलेल्या दिव्यांदू शर्माने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप उमटवून हटके भूमिका साकारणारा हा अभिनेता कार्निवल मोशन पिक्चर्सच्या आगामी मेरे देश की धरती या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मॉर्डन लुक व हातात कुदळ असलेला या चित्रपटातील त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला मेरे देश की धरती हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दोन इंजिनिअर्स तरुण स्वतः ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, ह्याची हलकी फुलकी रंजक कथा मेरे देश की धरती… देश बदल रहा है या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्यांदू सांगतो कि, मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱयाच्या एका वेगळय़ा भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतफत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास दिव्यांदू शर्मा व्यक्त करतो. दिव्यांदू शर्मा सोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.

मेरे देश की धरती या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नफत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे.

Related Stories

हार्दिक म्हणतो… मला आलं दडपण

Patil_p

‘साँग्स ऑफ पॅराडाइज’मध्ये सबा आझाद

Amit Kulkarni

लता मंगेशकर एक सागर

Patil_p

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Archana Banage

अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्यचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन

Tousif Mujawar

थुकरटवाडीचे विनोदवीर मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज

Patil_p
error: Content is protected !!