Tarun Bharat

मेसीच्या गैरहजेरीत बार्सिलोनाचा विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेसीने अलिकडेच स्पॅनीश फुटबॉल क्षेत्रातील अव्वल समजल्या जाणाऱया बार्सिलोना फुटबॉल क्लबला निरोप दिला. तब्बल 20 वर्षे मेसी आणि बार्सिलोना यांच्यातील संबंध अखेर संपुष्टात आले. दरम्यान मेसी उपलब्ध नसला तरी बार्सिलोनाला कोणतीच अडचण भासली नाही. त्याच्या गैरहजेरीत बार्सिलोना संघाने रविवारच्या सामन्यात ज्युवेंट्सचा पराभव केला.

बार्सिलोना क्लबतर्फे मेसीला दोन दिवसापूर्वी निरोप देण्यात आला होता. गॅमपेर फुटबॉल चषक स्पर्धेतील रविवारच्या सामन्यात बार्सिलोनाने ज्युवेंट्सचा 3-0 असा पराभव केला. मेमफिस डिपेने तिसऱयाच मिनिटाला बार्सिलोनाचे खाते उघडले. 60 व्या मिनिटाला ब्रेथवेटने बार्सिलोनाचा दुसरा गोल आणि रिक्वेई प्यूयेगने बार्सिलोनाचा तिसरा गोल नोंदविला. स्पेनमधील ला लीगा फुटबॉल हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला तर इटालियन सिरी ए फुटबॉल हंगामाला 22 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

Related Stories

कसोटी फलंदाजांत लाबुशाने प्रथमच अग्रस्थानी

Patil_p

तीन दशकानंतर सनीकडून म्हाडाचा भूखंड परत

Patil_p

पॅराआशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये

Patil_p

सित्सिपस, व्हेरेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मेमॉल रॉकी यांचा फुटबॉल प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

विकास कृष्णनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया

Patil_p
error: Content is protected !!