Tarun Bharat

मेहुण्याकडून भावोजीचा खून

दोघेही झारखंडचे, क्षुल्लक कारणावरुन खून, आरोपी जेरबंद

प्रतिनिधी / राय

कोल्हय़ादोंगर -राय येथे रविवारी रात्री झारखंड येथील एकाने झारखंड येथीलच दुसऱयाचा कुऱहाडीने वार करुन खून केला. मयत आणि आरोपी हे नात्याने मेहुणा आणि भावोजी आहेत.

कुडतरी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यातील  मुकेश सिंग (30) आणि याच राज्यातील आणि याच जिल्ह्यातील विवेकसिंग (43) हे दोघे कोल्यादोंगर -राय येथील एका घरात भाडय़ाने राहात. आरोपी विवेक देवसिंग याने आपला मेहुणा मुकेश सिंग याचा खून केला.

खुनाचे कारण

रविवारी 24 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला खुनाची ही घटना घडली होती. सकाळी भावोजी मुकेश सिंग आणि मेहुणा विवेक यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाले होते. दुपारी दोघांनीही दारु घेतली होती. त्यानंतर वाद चालूच होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार असल्यामुळे रात्रीही दोघांनी दारु ढोसली होती. जेवण केल्यानंतर दोघेही झोपी गेले. मात्र आरोपीच्या मनात वादळ घोघावत होते आणि म्हणून त्याला झोप येत नव्हती.

आपला मेहुणा झोपी गेल्याचे पाहुन रात्री 10.45 वाजण्याच्या सुमाराला आरोपी विवेकसिंग याने आपला भावोजी मुकेश याच्या डोक्यावर कुऱहाडीचा घाव घालून खून केला. एका घावाने आपला मेहुणा मेला नसावा असे समजून आरोपीने आणखी एकदा कुऱहाडीचा घाव झोपलेल्या मेहुण्यावर घालून त्याचा खात्मा केला.

मेंदुचा चेंदामेंदा झाल्याची खात्री केल्यानंतर आरोपी कोल्यादोंगर या राय गावातील वाडय़ावरुन फरार झाला. एव्हाना ही खबर मायणा -कुडतरी पोलिसांना कळाली. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसी सोपस्कार पूर्ण केले. मृतदेह शवचिकेत्सेसाठी नेण्यात आला.

झुडूपात लपलेला-जेरबंद

त्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु झाले आणि आरोपी राय येथे एका झुडूपात लपून बसला होता. त्याला कुडतरी पोलिसांनी जेरबंद केले. मुकेश सिंग याचा खून केल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली आरोपी विवेक देवसिंग याला अटक करण्यात आली.

द. गोव्याचे पोलीस अधीक्षक अरवींद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, उपनिरीक्षक तेजस नाईक, उपनिरीक्षक विकट हडफडकर तसेच चंद्रकांत उर्फ चंद्रू वेळीप यांनी या खून प्रकरणी महत्वाची कामगिरी केली.

Related Stories

मडगाव पालिका 25 लाख खर्चून नाले, गटारांची सफाई करणार

Omkar B

सोनसडा येथे 2 बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्याचा विचार

Amit Kulkarni

गोवा मद्यार्क विक्रेता संघटनेची मुख्यमंत्र्यांना भेट

Omkar B

तळेवाडा बेतकी शाळेच्या शेड, रंगमंचाचे उद्घाटन

Amit Kulkarni

वाहतूक संचालकाची हाकलपट्टी करा

Amit Kulkarni

गोवा रणजी संघ प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव शॉन टेटने फेटाळला

Amit Kulkarni