Tarun Bharat

मेहुल चोक्सी सुनावणीस अनुपस्थित

Advertisements

मानसिक तणाव अन् रक्तदाबाचा त्रास होत असल्याचा दावा

वृत्तसंस्था  / रोसेउ

भारतीय कायद्यांचा भंग करत देशातून फरार होणारा आणि पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी मानसिक तणाव आणि अतिरक्तदाबाच्या समस्येला तोंड देत आहे. डोमिनिकाच्या न्यायालयातील सुनावणीस अनुपस्थित राहण्यासाठी मेहुलने हेच कारण पुढे केले आहे.

डोमिनिकात अवैधमार्गाने शिरल्याप्रकरणी 14 जून रोजी चोक्सीला सुनावणीस उपस्थित रहावे लागणार होते. पण तो अनुपस्थित राहिला आहे. मेहुलची प्रकृती अधिक खराब झाल्याने तो उपस्थित राहू शकत नसल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले आहे.

वकिलाने त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले आहे. हे प्रमाणपत्र डोमिनिया चायना प्रेंडशिप हॉस्पिटलने प्रदान केले आहे. मागील 2 आठवडय़ांपासून याच रुग्णालयात मेहुलवर कथितरित्या उपचार सुरू आहेत. न्यायालयाने आता पुढील सुनावणी 25 जून रोजी निश्चित केली आहे.

न्यायालयाने चोक्सीला 17 जून रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत चोक्सी तूर्तास रुग्णालयात भरती राहणार आहे. डोमिनिकाचे पोलीस त्याच्यावर नजर ठेवणार आहेत. हे रुग्णालय चीनच्या आर्थिक मदतीतून उभारण्यात आले आहे हे विशेष.

चौक्सीने ताब्यात घेण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अँटीग्वा-बारबुडा येथून अपहरण करत डोमिनिकात आणले गेल्याचा त्याचा दावा आहे. तर चोक्सी अवैध मार्गाने डोमिनिकात शिरला असल्यानेच त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

नाटोने ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडल्यास धडा शिकवू

Patil_p

फ्रान्समध्ये सार्वजनिक स्थळी मास्क अनिवार्य

Patil_p

इस्रायलमधील सरकार संकटात

Patil_p

अल-कायदानंतर ‘आयएस-के’ची धमकी

Amit Kulkarni

जगभरात 2 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

मलेशियन पंतप्रधान महातीर मोहम्मद यांचा राजीनामा

tarunbharat
error: Content is protected !!