Tarun Bharat

मे महिन्यात वाहनांची रिटेल विक्री 55 टक्क्यांनी कमीच

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू वर्षातील एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात वाहनांची रिटेल (किरकोळ)विक्री 55 टक्क्यांनी कमी झाली असल्याचे दिसून आले आहे. ऑटोमोबाईल डिलर्स महासंघ (फाडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार जूनचा ट्रेंड चांगला राहिला असून संपूर्ण महिन्यात वातावरण सकारात्मक राहिल्यास विक्रीचे आकडे बदलणार असल्याचे म्हटले आहे.

फाडाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री ही 58 टक्क्यांनी घटून 85,733 युनिटवर राहिली. याच दरम्यान दुचाकींची विक्रीदेखील 52.52 टक्क्यांनी घटून 4,10,757 युनिट आणि तीनचाकींची विक्री 75 टक्क्यांनी घटून 5,215 वर राहिली आहे. तसेच मागील महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री 65 टक्के आणि ट्रक्टरची विक्री 56 टक्क्यांनी घसरली आहे.

फाडाचे अध्यक्ष विनकेश गुलाटी यांनी, देशात सध्या ऑटोमोबाईल उद्योगातील कंपन्यांना संघर्ष करावा लागतो आहे. कोरोना लाटेचा परिणाम विक्रीवर होत असून खऱया अर्थाने आर्थिक मदतीची गरज या क्षेत्राला असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

जेफ बेझोस ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती

Amit Kulkarni

विमा कंपन्यांना आरोग्य व्यवसायात 26,364 कोटीचे नुकसान

Patil_p

चालू वर्षात अर्थव्यवस्थेत 5.9 टक्क्मयांची घसरण : युएन

Omkar B

‘प्राईम डे’ला सर्व वर्गवारीमध्ये प्राईम सदस्यांचा प्रतिसाद

Patil_p

इफको टोकीयोने केले 400 जणांना भरती

Patil_p

2021-22 वर्षात 1.46 कोटी नोकऱया

Patil_p
error: Content is protected !!