Tarun Bharat

मैदान पूजनाने हालसिद्धनाथ यात्रेची सांगता

वार्ताहर/ कुर्ली

दरवर्षी श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रा संपल्यानंतर कुर्ली येथील शिंत्रे आखाडय़ात जंगी कुस्त्यांचे मैदान भरविले जाते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे कुस्त्यांचे मैदान रद्द करण्यात आले. गुरुवार 5 रोजी कुर्ली येथील शिंत्रे आखाडय़ातील मैदानाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून यात्रेची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी ऍड. संजय शिंत्रे, विजयकुमार शिंत्रे, रघुनाथ पाटील, वसंत पाटील, आण्णासो माळी, दत्ता पाटील, दत्ता कोकीतकर, बाळू माळी, राघू निकाडे, बाळासाहेब निकाडे, कृष्णात चव्हाण, बाळू पाणारी, नानासाहेब पाटील, रामदास जाखळे, महादेव आबणे, लहू पाटील, तुकाराम माळी, विनायक तेली, राजाराम ढगे, माजी ता. पं. सदस्य सखाराम घस्ती यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कुर्लीचे मल्ल आप्पासाहेब पाटील (शाहीर) यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Stories

कर्नाटकमध्ये दारू खरेदीसाठीची वयोमर्यादा 18 ऐवजी 21

Abhijeet Khandekar

सीआयडी पथकाकडून गांजा विक्रेत्यांना अटक

Patil_p

दसऱयाच्या खरेदीसाठी बाजारात वर्दळ

Amit Kulkarni

जिल्हा-तालुका पंचायत निवडणुका मेमध्ये?

Amit Kulkarni

शिवयोगी नागेंद्र स्वामींची पुण्यतिथी उत्साहात

Amit Kulkarni

निलजीत आज भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान

Amit Kulkarni