Tarun Bharat

मॉरिन्हो रोमा संघाचे नवे प्रशिक्षक

वृत्तसंस्था/ रोम

एएस रोमाने जोस मॉरिन्हो यांची नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रोमाने त्यांच्याशी तीन वर्षांचा करार केला असल्याचे या इटालियन सिरी ए क्लबने मंगळवारी जाहीर केले.

15 दिवसांपूर्वीच मॉरिन्हो यांची टॉटनहॅम हॉटस्पर संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. 58 वर्षीय मॉरिन्हो पॉलो फोन्सेका यांच्याकडून पुढील मोसमाच्या सुरुवातीला सूत्रे घेतील. फोन्सेका या मोसमातील मोहिम संपल्यानंतर पद सोडणार आहेत. मॉरिन्हो यांना हॉटस्परने 19 एप्रिल रोजी डच्चू दिला होता. या मोसमाच्या उत्तरार्धात त्यांच्या संघाने निष्प्रभ प्रदर्शन केल्याने प्रिमियर लीगच्या अव्वल स्थानावरून युरोपियन संघांच्या बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे क्लबने त्यांना पदच्युत केले होते.

Related Stories

भारतीय हॉकी संघाचा सामना आज न्यूझीलंडशी

Patil_p

चेल्सीचा टोटेनहॅमवर विजय

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये भारताचे दीपक काब्रा पहिले जिम्नॅस्टिक पंच

Patil_p

इस्ट बंगाल प्रशिक्षकपदाची धुरा रिव्हेराकडे कायम

Patil_p

मेदव्हेदेव, वावरिंका यांची विजयी सलामी

Patil_p

‘बायो-बबल’ तोडले तर मिळेल ‘ही’ शिक्षा!

Patil_p