Tarun Bharat

नराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार फाशीची मागणी

प्रतिनिधी / सातारा

बिलोली साठेनगर, जिल्हा नांदेड येथील मूकबधीर मुलीवर अमानवी अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार फाशी तसेच माजलगाव तालुक्यातील हिवरा बु. येथील मातंग वस्तीवर अमानुषपणे हल्ला करून धारदार शस्त्राने गंभीर जखमी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी.

नांदेड बिलोली साठेनगर व बीड जिल्ह्यामध्ये गोरगरीब जनतेवर अमानुष अत्याचार घडवणाऱ्या अमानवीय घटना घडलेल्या असून पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी घडलेली आहे. या घटनांचा जाहीर निषेध. आरोपींना पकडून त्वरित पकडून कठोर कारवाई करावी.

बिलोली येथील मातंग समाजातील मूक-बधीर मुलीवर बलात्कार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच, महाराष्ट्र शासनाने नव्याने मंजूर केलेला ‘शक्ती कायदा’ याचा आधार घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी सदर कायदा लागू करावा. बीड जिल्ह्यातील ता. माजलगाव हिवरा येथील मातंग समाजातील कुटुंबांवर दि.११ रोजी अमानुषपणे भ्याड हल्ला करण्यात आला आहे. तरी याबाबत संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी. तसेच सर्व पीडितांचे आणि त्याच्या कुटुंबियांचे योग्य पुनर्वसन करावे व अशा घटनांना आळा घालून त्या थांबविण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करावी. या घटनेतील आरोपींना कायदेशीर पळवाटा काढून वाचवणाऱ्या व तपासात ढिलाई करणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करणेबाबत.

शासनाने वरील सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन मातंग समाजावरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटनेसंदर्भात आरोपींना कडक शिक्षा करावी, असे निवेदन सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे सर,मधुकर घाडगे,उमेश खदंझोडे,किशोर गालफाडे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहे

Related Stories

पालिका निवडणुकीत शिवसेनाही घेणार उडी

datta jadhav

दुकानातील कामगारांनी केला दोन कोटींचा अपहार

Amit Kulkarni

कराडात बुधवारपासून दुकाने उघडणार

Patil_p

सातारा : म्युकर मायकोसिसचे जिल्ह्यात चार बळी

Patil_p

सातारा : अंभेरीत आढळला कोरोनाचा रुग्ण

Archana Banage

कारागृहातील संशयिताकडून पिस्टल घेतले

Amit Kulkarni