प्रतिनिधी / सेनापती कापशी
सेनापती कापशी – तमनाकवाडा दरम्यान आंबेओहोळ ओढ्याजवळ झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात माद्याळ (ता. कागल) येथील तरुण ठार झाला. श्रावण बाळू माने (वय २५) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी श्रावण माने हा मोटर सायकलने माद्याळहून सेनापती कापशीकडे जात होता. तमनाकवाडा व कापशी दरम्यान आंबेओळ जवळ एका वळणावर त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून तो रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आपटला. यामुळे डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जवळून जाणाऱ्या प्रवाशानी रुग्णवाहिका मागवून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान अपघात स्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती.


previous post