Tarun Bharat

मोटरसायकल घसरून अपघात; महिला जागीच ठार

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. तर पतीसह दोन मुले जखमी झाली. भाग्यश्री हनुमंत कुंभार ( वय २९, रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली ) असे मृत महिलेचे नाव आहे. पती हनुमंत विठ्ठल कुंभार ( वय ३८ ), मुलगा स्वराज कुंभार ( वय ६ ) व मुलगी शिवन्या ( वय ३ ) अशी जखमींची नावे आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील महाडिक बंगल्याजवळ रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हनुमंत कुंभार आपल्या मोटारसायकलवरून पत्नी व दोन मुलांसह कोल्हापूरला निघाले होते. पुलाची शिरोली येथे महामार्गाच्या मधोमद मोटरसायकल चालवत असताना महामार्गावरील पांढऱ्या पट्ट्या वरून मोटरसायकल अचानक घसरली. यामुळे हनुमंत यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि चौघेही महामार्गावर पडले. भाग्यश्री यांना डोळ्याच्या वरील बाजूस डोक्यावर जोराचा मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. हनुमंत, स्वराज व शिवण्या हे किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा याची नोंद घेण्याचे काम शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू होते.

Related Stories

अयोध्येतील राममंदिर साऱ्या विश्वाचा मानबिंदू ठरेल!

Archana Banage

ई़डी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार- हसन मुश्रीफ

Archana Banage

कोल्हापूर : सहकारी संस्था निवडणुकांना सहाव्यांदा ब्रेक

Archana Banage

कोरोना कालावधीतील वीज देयक हप्त्यात भरण्याची सवलत

Archana Banage

कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस 2 जुलै पासून धावणार

Archana Banage

फडणवीसांना समजेलेलं स्थानिक नेत्यांना उमजेल काय ?

Archana Banage