Tarun Bharat

मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने घेतली वाहतूक संचालकाची भेट

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

अखिल गोवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने विविध समस्यांचे निराकरण आणि रस्ता सुरक्षा कार्यक्रमाबद्दल नियोजनाकरिता नुकतीच वाहतूक संचालनालयाचे संचालक राजन सातार्डेकर यांची भेट घेतली आणि असोसिएशनने वाहतूक खात्याने रस्ता सुरक्षा कार्यक्रमाबाबत मांडलेला प्रस्ताव मंजूर केला.

ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गिरीश शर्मा यांची नुकतीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मोटरवाहन नियमांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. योग्यरित्या वाहन प्रशिक्षण देऊन अपघात थांबविणे हा असोसिएशनचा उद्देश आहे असे गोवा ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या संयोजक यशिका सावंत यांनी यावेळी सांगितले. दुसऱया बाजूने वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहतूक खाते हे समाजात रस्ता सुरक्षा शिक्षण देण्यात कटीबद्ध आहे. रस्ता सुरक्षा कार्यक्रमात संबंधित स्टेकहोल्डर्सनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रत्येकवेळी वाहतूक खाते करते. परंतु जर ड्रायव्हिंग स्कूलनी जागृती कार्यक्रम आयोजित केला तर सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकते असे मत सातार्डेकर यांनी व्यक्त केले.

Related Stories

ताजमहल निविदेद्वारे बांधला होता का?

Amit Kulkarni

खाजने-अमेरे-पोरस्कडे पंचायतीतर्फे गोवा मुक्तीदिन साजरा

Amit Kulkarni

सासष्टीत धिरयोच्या आयोजनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

Patil_p

नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी वास्कोत एका हल्लेखोराला अटक

Omkar B

साखळीत मनोजकुमार घाडी यांचा आपमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

कोविड निगा केंद्राला विरोध राजकीय प्रेरणेनेच !

Omkar B
error: Content is protected !!