Tarun Bharat

मोटारीची काच फोडून ४ लाखांची रोकड लंपास

प्रतिनिधी/कोल्हापूर

रस्त्याकडेल्या थांबलेल्या मोटारीची काच फोडून चोरटय़ाने 4 लाख रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लिशा हाŸटेल चौकात हा प्रकार घडला. याबाबतची फिर्याद टायर विक्रेते चेतन अशोक मेहता (वय 38, रा. जाधववाडी) यांनी शाहूपुरी पािलसांत फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जाधववाडी येथे राहणाऱया चेतन मेहता यांचे कावळा नाका परिसरात टायर विक्रीचे शोरुम आहे. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करुन जाधववाडी येथे घरी चालले होते. 9 वाजण्याच्या सुमारास तेलिशा हॉटेल चौकात मोटार उभी करुन कामानिमित्त थांबले होते. काम आटोपून ते अवघ्या 10 मिनिटात परतले असता, त्यांना मोटारीची चालकाच्या बाजूची काच फुटलेली दिसली. त्यांनी दुकानातील चार लाखांची रोकड बॅगेत भरुन ठेवली होती. चोरटय़ाने ही बॅग लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ शाहूपुरीपोलिसांना दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी भेटदिली. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Related Stories

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत गव्याचे दर्शन

Archana Banage

मराठा आरक्षण : राज्य सरकार करणार फेरविचार याचिका दाखल

Archana Banage

कोल्हापूरात सर्किट बेंचसाठी सदाभाऊंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Abhijeet Khandekar

सांगली : पशुवैद्यकीय पदविका धारण करणाऱ्यांना सहकार्यासाठी सेवेत घ्या

Archana Banage

ऑगस्टमध्येच ऑक्टोबर`हिट’..!

Archana Banage

कोल्हापूर : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

Archana Banage