मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना फेसबुक पोस्ट करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.


काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी कोरोनाच चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिची ट्वीट करत दिली आहे.