Tarun Bharat

मोठी कारवाई : भारतीय लष्कराने उरी सेक्टरमध्ये केले २५ कोटींचे ड्रग्स जप्त

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर

मुंबईतील अमली पदार्थ तस्करी विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. यानंतर आता देशाच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये २५ ते ३० किलो हेरॉईन जप्त केले आहे. याची अंदाजे किंमत सुमारे २५ कोटी रुपये होते. लष्कराने ही कारवाई करुन अंमली पदार्थ आपल्या ताब्यात घेत ते बारामुल्ला पोलीसांच्याकडे सुपुर्द करत या प्रकरणी बारामुल्ला पोलीस स्टेशमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लष्कराला उरी सेक्टर नियंत्रण रेषेजवळ दोन पिशव्या जप्त केल्या होत्या. या पिशव्यांमध्ये २५ ते ३० किलो अंमली पदार्थ पदार्थ असल्याचे लक्षात आल्यावर लष्कराने बारामुल्ला पोलीसांना सतर्क करत याबाबत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. लष्कराला काही संशयास्पद हालचाली दिसुन आल्यानंतर केलेल्या तपासणीत लष्कराच्या हाती अंमली पदार्थ लागला आहे. ड्रग्ज तस्कर लष्काराच्या हालचालींवर नजर ठेवत तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र लष्कराच्या सतर्कतेने हा त्यांचा प्रयत्न असफल झाला आहे.

Related Stories

बंगालमध्ये लस प्रमाणपत्रावर ममतांचा फोटो

Patil_p

‘त्या’ने स्वतःच्या आईलाच मारले

Patil_p

Swaroopanand Saraswati : हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

Abhijeet Shinde

नक्षलवाद बनला आहे फायदेशीर धंदा

Patil_p

‘भाजपच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही’; काँग्रेसचा उद्या ईडी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Shinde

या महिन्यात गरिबांना दुप्पट धान्य मोफत देणार दिल्ली सरकार

Rohan_P
error: Content is protected !!