Tarun Bharat

‘मोठी जबाबदारी, ती पार पाडायला आवडेल’ : दिलीप वळसे पाटील

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तशी शिफारस केली होती. ही शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. 


‘जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल,’ अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील हे आजच दुपारी गृहमंत्रीदाचा चार्ज घेणार आहे. तत्पूर्वी दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चित आवडेल. मी दुपारी 1.30 वाजल्यानतंर मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारणार आहे. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.


दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्याकडील कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Related Stories

ई-इन्व्हाईसमुळे बसणार जीएसटी करचुकवेगिरीला चाप- सहा.आयुक्त मोहन वाघ

Abhijeet Khandekar

भाजपविरोधात पवारांची मोर्चेबांधणी, 15 पक्षांची बोलावली बैठक

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यातील मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी

Archana Banage

सचिन वाझे माफीचा साक्षीदार ; कोर्टाकडून अर्ज मंजूर

Archana Banage

मला रोखण्यासाठीच हे कारस्थान; ED च्या समन्सनंतर राऊतांचं ट्विट

datta jadhav

कराड पालिकेच्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून खास दखल

Patil_p
error: Content is protected !!