Tarun Bharat

मोठी बातमी : राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार- राजेश टोपे

Advertisements

मुंबई \ ऑनलाईन टीम

मराहाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर चर्चा झाली असून याबाबत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लोकल आणि लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लोकांचा लसीकरण कार्यक्रमास तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. दुसऱ्या डोसचे राज्यात 20 लाख लाभार्थी असून केवळ 10 लाख डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे सुरुवातील दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.

Related Stories

तुकोबांची शिळा ही भक्ती, आधाराचं केंद्र

datta jadhav

एमएलजी हायस्कूल ते ‘ऑस्कर’ व्हाया जे. जे. आर्टस्

Archana Banage

मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली!

datta jadhav

मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच सोमय्या, पडळकर यांना अटक

datta jadhav

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6907 वर

Tousif Mujawar

महाराष्ट्र सरकार ‘रेमडेसिवीर’ची 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार

datta jadhav
error: Content is protected !!