विविध सुविधांसह सादर : ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन उपलब्ध होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकांना कमी बजेटमध्ये फोन खरेदी करता यावा यासाठी एचएमडी ग्लोबलने कमी किमत असणारे नोकियाकडून तीन फोन सादर करण्यात आले आहेत. या यादीमध्ये नोकिया सी 21 आवृत्ती आणि नोकिया सी2 दुसऱया आवृत्तीचा समावेश आहे.
तीन फोनमध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे अँड्रॉईड गो वर काम करत आहे. दुसऱया फोनप्रमाणे नोकिया सी21, नोकिया सी21 प्लस आणि नोकिया सी2 दुसरी आवृत्तीला भारतामध्ये सादर केलेले नाही. त्यांनी सर्वात पहिल्यांदा युरोपमध्ये फोन सादर केले आहेत. यानंतर लवकरच दुसऱया देशांमध्ये सदरचे फोन सादर केले जाणार आहेत. भारतीय बाजारामध्ये हा फोन केव्हा, किती किमतीसोबत येणार आहे याची माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही.
नोकिया सी21, सी21प्लस, सी2 ची किमत
नोकिया सी21ची किमत जवळपास 8,500 रुपये तसेच हा नवीन नोकिया फोन अँड्रॉईड गो व्हर्जनचा आहे. तसेच यातील किमती मॉडेलनुसार निश्चित होणार असल्याची माहिती आहे.
फिचर्स ः
w नोकिया सी21 गुगल ऍप्सच्या लाईट व्हर्जनसोबत प्रीलोडेड
w यामध्ये गुगल गो, जीमेल गो, युटय़ूब गो आणि मॅप्स गो यांचा समावेश
w नोकिया सी21 मध्ये 6.517 इंच एचडी व एलसीडी याच्यावर एक नॉच
w 5 मेगाफिक्सलचा सेल्फी कॅमेरा तसेच मुख्य कॅमेरा 8 एमपी सेंसर
w 3000 एमएएच रिमूव्हेबल क्षमतेची बॅटरी